Pakistan qualification scenarios : भाऊ पाकिस्तान अजूनही जाऊ शकतो सेमीफायनलमध्ये! चॅम्पियन्स ट्रॉफी शर्यत झाली रंजक, जाणून घ्या समीकरण
How Pakistan Can qualify for Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग दुसऱ्या सामन्यात यजमान पाकिस्तानला विजयाचे खाते उघडता आले नाही.

How Pakistan can still qualify for Champions Trophy semi-finals : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग दुसऱ्या सामन्यात यजमान पाकिस्तानला विजयाचे खाते उघडता आले नाही. कराचीमध्ये न्यूझीलंडकडून पराभव पत्करल्यानंतर आता दुबईमध्ये त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी भारताकडून पराभव पत्करावा लागला. सलग पराभवांनंतर पाकिस्तानचा प्रवास स्पर्धेच्या गट टप्प्यातच संपत असल्याचे दिसून येत आहे. पण, त्याच्या प्रवासात अजूनही ट्विस्ट असू शकतो. याचा अर्थ असा की, पाकिस्तान संघ अजूनही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.
India win the match by six wickets.#PAKvIND | #ChampionsTrophy pic.twitter.com/woTMIH4M8n
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 23, 2025
पाकिस्तानी संघ शेवटच्या स्थानावर
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ खेळत आहेत, ज्यांना दोन गटात विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटात 4 संघ आहेत. पाकिस्तान संघ भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेशसह अ गटात आहे. आता त्यांनी गट फेरीत न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध सामने गमावले आहेत. पण बांगलादेशविरुद्धचा सामना अजून बाकी आहे. पण पाकिस्तानी संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप अ च्या पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट 1.087 आहे. त्यांचा बांगलादेशविरुद्ध एक सामना बाकी आहे, जो त्यांना 27 फेब्रुवारी रोजी खेळायचा आहे. पाकिस्तानला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी नशिबाची साथ हवी आहे.
पाकिस्तानची उपांत्य फेरी गाठण्याची समीकरणे
- बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 24 फेब्रुवारी रोजी रावळपिंडीच्या मैदानावर खेळवला जाईल. बांगलादेश संघाने न्यूझीलंडचा पराभव करावा अशी प्रार्थना पाकिस्तानला करावी लागेल.
- पाकिस्तानी संघ 27 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध खेळेल आणि उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानी संघाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. जेणेकरून त्याचा नेट रन रेट वाढेल.
- भारतीय संघाला 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळायचा आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकावा अशी प्रार्थना पाकिस्तानी संघाला करावी लागेल.
जर वरील तीन समीकरणे जुळून आली तर भारतीय संघ अ गटातून तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. तर पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्यानंतर, तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन गुण समान असतील. या परिस्थितीत, जर पाकिस्तानी संघ बांगलादेशविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकला. तर त्याचा नेट रन रेट न्यूझीलंड आणि बांगलादेशपेक्षा जास्त होईल. मग पाकिस्तानी संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.
हे ही वाचा -





















