एक्स्प्लोर

Dhananjay Munde: कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, धनंजय मुंडेंना किती?; सुरेश धसांनी दिलं रेटकार्ड

आजारी असल्याने मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी झालेल्या आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत

बीड : राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) कृषी विभागातील घोटाळ्यांचे गंभीर आरोप करत तब्बल 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांनी केला आहे. कृषी खात्यांतर्गत विविध साहित्य, खते व उपकरणांच्या खरेदींमध्ये हा भ्रष्टाचार झाल्याचे आमदार धस यांनी म्हटले आहे. यासह, कृषी विभागातील कृषी सहायक ते उपसंचालक पदापर्यंतच्या बदल्यांसाठी तब्बल 100 कोटी रुपयांची तडजोड झाली आहे. 20 हजार रुपयांपासून ते तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंत ही रक्कम संबधित कृषी सहायकांपासून ते तंत्र अधिकाऱ्यांकडून घेण्यात आल्याचा दाव आमदार धस यांनी केला आहे. आमदार धस यांनी या बदल्यासाठीचे रेटकार्डच प्रेसनोटमधून जाहीर केलं आहे. कृषी विभागात धनंजय मुंडे यांच्या कालावधीत बदल्या आणि पदोन्नत्यांचे दर खालील प्रमाणे होते, असे सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेतून केला असून रेटकार्डही त्यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रेसनोटमधून म्हटले आहे. 

आजारी असल्याने मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी झालेल्या आमदार सुरेश धस यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंच्या वरदहस्ताने कृषी खात्यात 300 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केले आहेत. शेतकऱ्यांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कोणतीही मागणी नसताना खरेदी करण्याचा निर्णय घेतला. एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला आणि त्याच दिवशी जीआर निघाला. हे सर्व डीबीटीने द्यावे असे तत्कालीन सनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी सूचवले होते. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार उपसचिव संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यासाठी अग्रिम देण्यात यावा असे आदेश काढल्याची माहिती आमदार धस यांनी दिली. तर, कृषी विभागातील बदल्यांसाठी तब्बल 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचाही दावा करत त्यांनी चक्क रेटकार्डच जारी केलं आहे. त्यामध्ये, कोणत्या अधिकाऱ्याकडून बदलीसाठी किती रक्कम घेतली जाते, व त्यातील किती रक्कम धनंजय मुंडेंना मिळते हेही त्यांनी दाखवलं आहे. 

बदल्यांसाठी 20 हजार ते 1 कोटी

कृषी सहाय्यक 60,000/- रुपये त्यामध्ये 20,000/- वाटा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना मिळत होता. आणि उरलेले 40,000/- विभागीय कृषी सहसंचालक यांना.

कृषी पर्यवेक्षक 1,50,000/- त्यामध्ये 40,000/- वाटा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मिळत होता उरलेले संबंधित विभागीय कृषी सहसंचालक यांना.

कृषी अधिकारी 3,00,000/- क्षेत्रीय मंडळ कृषी अधिकारी यांच्या बदलीचा रेट होता, ते संपूर्णपणे धनंजय मुंडे यांच्याकडे जात होते.

कार्यालयीन कृषी अधिकारी 2,00,000/- संपूर्णपणे धनंजय मुंडे यांच्याकडे जात होते.

तालुका कृषी अधिकारी 5,00,000/- संपूर्णपणे धनंजय मुंडे यांच्याकडे जात होते.

कार्यालयीन तंत्र अधिकारी 4,00,000/- संपूर्णपणे धनंजय मुंडे यांच्याकडे जात होते.

उपविभागीय कृषी अधिकारी 7,00,000/- संपूर्णपणे धनंजय मुंडे यांच्याकडे जात होते.

कृषी उपसंचालक 5,00,000/- संपूर्णपणे धनंजय मुंडे यांच्याकडे जात होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 9,00,000/- कमीत कमी आणि जास्तीत जास्त 30,00,000/-जिल्हा आणि योजनांची उपलब्धता तपासून हा दर ठरविला जात होता. संपूर्णपणे धनंजय मुंडे यांच्याकडे जात होते.

विभागीय कृषी सहसंचालक ठाणे विभाग करीता 80,00,000/- पुणे आणि नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर करीता विभाग 

60,00,000/-, अमरावती विभाग 40,00,000/-नागपूर विभाग 40,00,000/- संपूर्ण वाटा कृषी मंत्री यांच्याकडे.

संचालक पदाकरिता संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण 5,00,00,000/- रुपये इतर संचालक 2,00,00,000/- संपूर्ण वाटा कृषी मंत्री यांच्याकडे.
संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण कार्यालयातील

तंत्र अधिकारी ते विभागीय अधिकारी 

तंत्र अधिकारी खते १,००,००,०००/- (एक कोटी रु)
कृषी अधिकारी खते ६०,००,०००/-(साठ लक्ष रु)
तंत्र अधिकारी बियाणे २५,००,०००/- (पंचवीस लक्ष रु)
कृषी अधिकारी बियाणे १५,००,०००/- (पंधरा लक्ष रु)
कृषी उपसंचालक बियाणे ८०,००,०००/- (ऐंशी लक्ष रु)
तंत्र अधिकारी कीटकनाशके ५०,००,०००/- (पन्नास लक्ष रु)
कृषी अधिकारी कीटकनाशके ३०,००,०००/- (तीस लक्ष रु)
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी गुण नियंत्रण
विभाग पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक १,००,००,०००/- (एक कोटी रु)
उर्वरित सर्व विभाग५०,००,०००/- (पन्नास लक्ष रु)
त्यांच्या अधिनस्त कार्यरत असणारे कृषी अधिकारी सर्व विभाग ३०,००,०००/- (तीस लक्ष रु)
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, जळगाव, नांदेड, कोल्हापूर, जालना, यवतमाळ या जिल्हा करीता
६०,००,०००/- (साठ लक्ष रु)
नागपूर विभागातील गुणवत्ता नियंत्रण अधिकारी जिल्हास्तरावरील
१०,००,०००/- (दहा लक्ष रु)
अमरावती व मराठवाडा, कोकण, ठाणे विभागातील इतर जिल्ह्यांसाठी
२५,००,०००/- (पंचवीस लक्ष रु)
पुणे, नाशिक व कोल्हापूर विभागातील इतर जिल्ह्यांसाठी ४०,००,०००/- (चाळीस लक्ष रु)

चौकशी बंद करण्यासाठी 25 लाख ते 1 कोटी

दरम्यान, इतर कोणत्याही पदासाठी स्वतःच्या कुटुंबाजवळ राहण्यासाठी म्हणून मंत्री स्तरावर होणाऱ्या बदल्यांमध्ये कमीत कमी २,५०,०००/- (दोन लक्ष पन्नास हजार) रुपये द्यावे लागत होते. तर, पदोन्नती प्रक्रियेतील ज्या अधिकाऱ्यांच्या चौकशी सुरू आहेत त्या अधिकाऱ्यांच्या चौकशा बंद करण्यासाठी कमीत कमी २५,००,०००/ (पंचवीस लक्ष रु) ते १,००,००,०००/- (एक कोटी रु) एवढे रुपये घेतले जात होते, असा गंभीर आरोप आमदार धस यांनी केला आहे. सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या आणि पदोन्नत्यांच्या नस्ती यांची पाहणी आणि अभ्यास केला असता ७०% ते ८०% बदल नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी शिवाय केलेले आहेत. या सर्व बदल्या व पदोन्नतीमध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे, प्रशांत भामरे, रविकिरण पाटील यांनी कृषी आयुक्तालय स्तरावरील व संपूर्ण महाराष्ट्रात काही ठराविक एजंटची नेमणूक केलेली होती. प्रशांत भामरे व रविकिरण पाटील यांचे सीडीआर रिपोर्ट भ्रमण दूरध्वनी व कार्यालयातील दूरध्वनीचे तसेच व्हॉट्सअपवरील कॉल संबंधित कंपनीकडून माहिती मागविल्यास सर्व एजंट ची नावे बाहेर पडतील, असेही आमदार धस यांनी म्हटले.

हेही वाचा

महाराष्ट्र चक्रावेल असा घोटाळा, बदल्यांचे रेटकार्ड, 300 कोटींचा भ्रष्टाचार; सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचा सगळंच काढलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
Israel Gaza Airstrike : युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Violance FIR | नागपूर तणावाबाबत दाखल एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती, सूत्रधाराचे नाव समोर?Nagpur Crime Update | नागपूरच्या दगडफेकीमागे काश्मीर दगडफेकीचा पॅटर्न, पोलिसांचा तपास सुरुABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 19 March 2025 : 12 Noon

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
Israel Gaza Airstrike : युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
World Most Expensive Dog : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Video : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Ranya Rao Gold Smuggling Case : 10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक दोन वर्षात कितीवेळा दुबईल गेली?
10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक फक्त 24 महिन्यात कितीवेळा दुबईल गेली?
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
Sangli News : भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
Embed widget