एक्स्प्लोर
एजे करणार लीलाला फिल्मी स्टाईलने प्रपोज, थेट कश्मीरच्या बर्फात दोघांत फुलणार रोमान्स, 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचे खास फोटो समोर!
सध्या वरी मिळे हिटलरला या मालिकेची महाराष्ट्रभर चर्चा आहे. ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर आली आहे. नुकतेच या मालिकेचे शूटिंग कश्मीरमध्ये पार पडले.

navri mile hitlerla
1/11

सध्या झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मराठी मालिकेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. ही मालिका चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.
2/11

आता ही मालिका एका नव्या वळणावर आली आहे. एजे आणि लीला यांची प्रेमकहाणी आता काश्मीरमध्ये फुलणार आहे.
3/11

विशेष म्हणजे बर्फाळ प्रदेशात एजे लीलाला एकदम हटे प्रपोज करणार आहे. या सीनचे शूटिंग नुकतेच पार पडले. या शूटिंगचे समोर आलेले फोटो पाहून या दोघांमध्ये छान केमिस्ट्री रंगणार असल्याचा अंदाज लावला जातोय.
4/11

एजेला लीलाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि तिची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल यासाठी एजे प्रयत्नरत आहे. तर दुसरीकडे लीलाला एजेकडून एकदम फिल्मी स्टाईल प्रपोज हवंय.
5/11

लीलाचं म्हणणं आहे की जसं आपलं नातं युनिक आहे तसं प्रपोजलही युनिकच हवं. तिची दुसरी इच्छा आहे की एजेने आपल्याला छान थंड प्रदेशात घेऊन जावं. जिथे छान बर्फ असेल तिथे उभं राहून लीलाला छान रोमँटिक डान्स करायचा आहे.
6/11

तसेच तिला शिकारा राईडही करायची आहे. आता एजे लीलाच्या या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. ह्या सगळ्या इच्छा एजे पूर्ण करणार आहे. कारण एजे आता खरंच लीलाच्या प्रेमात पडला आहे.
7/11

या शूटबाबत ‘वल्लरी विराजने’ म्हणजे लीलाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. आम्ही काश्मीरला गेलो होतो. तिथे आम्ही ४ दिवस शूट केलं. आम्ही निसर्गमय बर्फाच्या चादर ओढलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग केले.
8/11

तिकडे शूटिंग करण इतकं सोपं न्हवतं, कारण प्रचंड थंडी होती. पण बर्फात शूट करायची मज्जा काही वेगळीच होती. आम्ही गुलमर्गला बर्फात एजे-लीलाचा प्रपोजल सीन शूट केला. गुलमर्गमध्ये बर्फात साडी नेसून एक गाणंही शूट केलं गेलं, जो माझ्यासाठी एक मोठा टास्क होता, असं वल्लरी म्हणाली.
9/11

मला साडीत खूप थंडी वाजत होती. मी पूर्ण वेळ कुडकुडत होते. जसा सीन कट होत होता मला आमचं युनिट लगेच जॅकेट आणून देत होतं. खासकरून 'नवरी मिळे हिटलरला'ची जी क्रिएटिव्ह आहे मनाली तिनी माझी अतिशय काळजी घेतली. एजे म्हणजेच राकेश बापटनेही मला खूप सपोर्ट केला, असंही तिने सांगितलं.
10/11

आम्ही शिकारामध्ये बसूनही शूट केलं. तो ही एक छान अनुभव होता. हे सगळं स्क्रीनवर बघताना प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. काश्मीरला शूट करण्याचा हा अनुभव सदैव माझ्या स्मरणात राहील, अशा भावना वल्लरीने व्यक्त केल्या.
11/11

'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठीवर दाखवली जाते.
Published at : 23 Feb 2025 04:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion