फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी शिंदेंचा बाण आणि अजित पवारांचं घड्याळ निवडून दिलं, सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बाण आणि अजित पवारांचे (Ajit Pawar) घड्याळ निवडून दिल्याचे वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं.

Maharashtra Politicis : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बाण आणि अजित पवारांचे (Ajit Pawar) घड्याळ निवडून दिल्याचे वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केलं. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. सोबतच घड्याळ आणि बाणालाही लोकांनी मते दिल्याचे धस म्हणाले. नाहीतर आमच्या लोकांनी घड्याळाला मतं दिली असती का? असा सवाल सुरेश धसांनी उपस्थित केला.
बाणाची आणि आमची जुनी दोस्ती. मात्र, एकनाथ शिंदेंचा बाणही लोकांनी निवडून दिल्याचे धस म्हणाले. आमदार सुरेश धस हे धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या विधानसभा विजयाचे गणित मांडले. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांना सांभाळणारा नेता म्हटलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, असे म्हणत सुरेश धसांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केलं.
विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा?
288 पैकी 234 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता. तर, महाविकास आघाडीने केवळ 50 जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला 132, शिवसेनेला (शिंदे) 57, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) 41 जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) 20, काँग्रेसला 16 व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 10 जागा जिंकल्या आहेत. विधानसभा निवड़णुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. तर महायुतीला मोठं यश मिळालं होतं. सर्वात मोठा पक्ष हा भाजप बनला होता. भाजपने 132 जागा जिंकल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या:
संतोष देशमुख हत्या प्रकरण: जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही, आमदार सुरेश धसांची भूमिका























