एक्स्प्लोर
सनी लिओनीसोबत घडली होती धक्कादायक घटना, चक्क चाकू सोबत घेऊन फिरण्याची आली होती वेळ; जाणून घ्या कोण त्रास द्यायचं?
सनी लिओनीसोबत एकदा भीतीदायक प्रसंग घडला होता. या प्रसंगामुळे तिला सोबत चक्क चाकू घेऊन फिरावे लागत होते. या प्रसंगाबाबत तिने सविस्तर सांगितले आहे.

sunny leone (फोटो सौजन्य- instagram)
1/10

अभिनेत्री सनि लिओनीने अगदी कमी काळात बॉलिवुडमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली. ती आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत तसेच आयटम साँगमध्ये दिसलेली आहे.
2/10

दरम्यान, बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्याआधी याआधीच्या जीवनामुळे तिला मोठा विरोध करण्यात आला होता. मात्र आता ती बॉलिवुडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे.
3/10

या अभिनेत्रीचे देशभरात कोट्यवधीने चाहते आहेत. मात्र तिच्यावर टीका करणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही. ती याआधी अभिनेता अरबाज खानच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने ट्रोलर्सबद्दलचा एक भीतीदायक किस्सा सांगितला होता.
4/10

तुम्ही कधी एखाद्या ट्रोलर्सविरोधात तक्रार दाखल केलेली आहे का? असे विचारले होते. त्यावर उत्तर देताना तिने हा किस्सा सांगितला होता.
5/10

सनी लिओनीने सांगितल्यानुसार सनी लिओनीला त्रास देणारी व्यक्ती ही तिच्या ओळखीचीच होती. आता मात्र ही व्यक्ती कुठेतरी गायब झालेली आहे. सनी लिओनीने त्या व्यक्तीला ब्लॉक केलेलं आहे.
6/10

विशेष म्हणजे या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून तिने मुंबई सायबर क्राईममध्ये तक्रारही केली होती. या व्यक्तीने अगोदर सनी लिओनीला मानसिकरित्या खूप त्रास दिला होता.
7/10

या व्यक्तीचे फॉलोअर्सही सनी लिओनीच्या टाईमलाईनवर घाणेरडे कमेंट्स करायचे. ट्रोल करणारे हे लोक खूपच आक्रमक होते. त्यांनी सनी लिओनीच्या कुटुंबीयांनाही धमकावले होते.
8/10

विशेष म्हणजे या व्यक्तीशी संबंध असणारे काही लोक सनी लिओनीच्या घरीदेखील पोहोचले होते. त्यावेळी सनी लिओनी चांगलीच घाबरली होती. त्यावेळी सनी लिओनी चक्क हातात चाकू घेऊन दरवाजाजवळ गेली होती.
9/10

ही घटना घडली तेव्हा सनी लिओनीचे पती तिच्यासोबत नव्हते. पुढे कित्येक दिवस सनी लिओनी सोबत चाकू घेऊन फिरायची. हा प्रसंग खुद्द सनी लिओनीनेच सांगितला होता.
10/10

सनी लिओनी
Published at : 19 Feb 2025 11:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion