कधीच कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावेत, अंजली दमानियांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा
Anjali Damania : धनंजय मुंडे यांना Bell’s Palsy झाल्याचे कळले. कोणालाच कधी आजार होऊ नये. ते लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा असे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
Anjali Damania : मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) डोळ्याच्या आजारातून बाहेर येत नाहीत, तोपर्यंत आता त्यांना एका नव्या आजाराने ग्रासले आहे. धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी हा आजार झाला आहे. त्यांना 2 मिनिटेही नीट बोलता येत नाही, अशी माहिती त्यांनी स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करुन दिली आहे. दरम्यान, याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damania) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांना Bell’s Palsy झाल्याचे कळले. कोणालाच कधी आजार होऊ नये. ते लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा असे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
Bell’s Palsy हा एक nerve चा आजार आहे हा कधी स्ट्रेसमुळं व कधी herpes ची साइड रिएक्शन म्हणून होतो. ते लवकर म्हणजे 4 आठवड्यात ठीक होतीलच. (हा माझा विषय आहे म्हणून मी म्हणत आहे). माझी लढाई त्यांच्या वृत्ती विरुद्ध आहे. त्यांच्या दहशती विरुद्ध आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध आहे. ती चालू राहीलच पण त्यांना तब्येतीसाठी शुभेच्छा असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांना Bell’s Palsy झाल्याचे कळले. कोणालाच कधी आजार होऊ नये. ते लवकर बरे व्हावे या साठी शुभेच्छा.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 20, 2025
Bell’s Palsy हा एक nerve चा आजार आहे हा कधी स्ट्रेस मुळे व कधी herpes ची साइड रिएक्शन म्हणून होतो. ते लवकर म्हणजे ४ आठवड्यात ठीक होतीलच. (हा माझा विषय आहे म्हणून मी…
नेमकं काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ.टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell's palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे, सध्या एक-दोन कॅबिनेट बैठका आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही, अशी माहिती मंत्री मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टममधून दिली.
बेल्स पाल्सी म्हणजे काय? (What is Bell's Palsy)
"बेल्स पाल्सी" ही एक मेंदूशी संबंधित म्हणजेच न्यूरोलॉजिकल समस्या आहे, ज्यामध्ये चेहऱ्याची नस (फेशियल नर्व) कमजोर होते किंवा प्रभावित होते, त्यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होते.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell's Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

