India Vs Pakistan : तर विचार करा भारत दुबईत किती पळवून मारेल, भारताने पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही बनवलं तर माझं नाव बदला! कोणी केली भविष्यवाणी?
न्यूझीलंडने पाकिस्तानचा 60 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवानंतर भारत विरुद्ध यजमान पाकिस्तानमध्ये करा किंवा मरो अशी लढत होणार आहे.

India Vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 60 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवानंतर भारत विरुद्ध यजमान पाकिस्तानमध्ये करा किंवा मरो अशी लढत होणार आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानला भारताविरुद्ध कोणत्याही किंमतीत विजय नोंदवावा लागेल. मात्र, पहिल्या सामन्यातील कामगिरी पाहून कथित फिल्म समीक्षक कमाल खानने पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.
तर विचार करा भारत किती पळवून मारेल!
कमाल खानने ट्विट करत म्हटले आहे की, पाकिस्तानला (Pakistan) पाकिस्तानमध्ये न्यूझीलंडने इतक्या वाईट पद्धतीने हरवलं असेल, तर विचार करा दुबईत भारत किती पळवून मारेल. भारताने (India) पाकिस्तानी खेळाडूंना कुत्रं नाही केलं, तर माझं नाव बदला. दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाकिस्तानचा संघ पराभूत करू शकेल का? भारताला पराभूत करणे खूप कठीण आहे, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे सुद्धा आहे. मोहम्मद रिझवान आणि पाकिस्तान संघ आक्रमक क्रिकेट खेळण्यात अपयशी ठरल्याचेही त्याने म्हटले आहे.
अगर Pakistan को New Zealand ने पाकिस्तान में इतनी बुरी तरह से हराया है, तो ज़रा सोचिए कि India, Pakistan को Dubai में कैसे दौड़ा दौड़ाकर हराएगा! India ने Pakistan के खिलाड़ियों को कुत्ता ना बना दिया, तो मेरा नाम बदल देना! #iccchampionstrophy2025
— KRK (@kamaalrkhan) February 20, 2025
'भारतीय संघाला पराभूत करणे कठीण वाटते, पण...'
शोएब अख्तरने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर आपले मत मांडत आहे. शोएब अख्तर व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, आता पाकिस्तानसाठी करा किंवा मरो अशी स्थिती आहे. भारतीय संघ खूप मजबूत आहे, त्या भारतीय संघाला पराभूत करणे कठीण वाटते, पण सर्व शुभेच्छा पाकिस्तान संघाला आहेत. मला विश्वास आहे की, पाकिस्तान संघ भारताचा पराभव करण्यात यशस्वी होईल. तो म्हणाला की, पाकिस्तान संघाकडे दुसरा पर्याय नाही, पण तुम्ही नक्कीच आक्रमक क्रिकेट खेळू शकता.
View this post on Instagram
'पाकिस्तान पूर्णपणे वेगळे क्रिकेट खेळत आहे, बाकी जग...'
या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर म्हणत आहे की, तुम्ही पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड मॅच नक्कीच पाहिली असेल. माझ्याप्रमाणे तुमचीही निराशा होईल. इतर जगाच्या तुलनेत पाकिस्तान पूर्णपणे वेगळे क्रिकेट खेळत आहे, पाकिस्तानचे क्रिकेट पूर्णपणे वेगळे आहे, हा संघ वेगळ्या प्रकारचा क्रिकेट खेळत आहे. तुमच्याकडे कोणतेही प्रभावशाली खेळाडू नाहीत, तुमच्या खेळाडूंचा स्ट्राइक रेट खूपच कमी आहे, तुमचे खेळाडू 100 च्या स्ट्राइक रेटने खेळू शकत नाहीत. तो म्हणाला की आमचे गोलंदाज सहज धावा देत आहेत. पाकिस्तान संघात फक्त 4 गोलंदाज आहेत, तर इतर संघांकडे बघितले तर या सर्वांमध्ये किमान 6-7 गोलंदाज आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

