एक्स्प्लोर

Akshaye Khanna Chhaava Movie: करिअरची सुरुवात फ्लॉप फिल्मनं, पण 'छावा'तील औरंगजेब ठरला हिट; 27 वर्षांत 22 फ्लॉप देऊनही नेटवर्थमध्ये विक्की कौशललाही मात देतो अक्षय खन्ना

Akshaye Khanna Chhaava Movie: करिअरच्या सुरुवातीलाच फ्लॉपचा शिक्का, पण 'छावा'तील औरंगजेबामुळे मिळाला हीट होण्याचा मान; 27 वर्षांत 22 फ्लॉप देऊनही नेटवर्थमध्ये विक्की कौशलपेक्षा जास्तच आहे.

Akshaye Khanna Chhaava Movie Aurangzeb

1/10
विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाचं खूप कौतूक होत आहे. त्याच्या उत्कृष्ट अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण, एक स्टारकीड असूनही अक्षय खन्ना चित्रपटांच्या बाबतीत मात्र थोडासा दुर्दैवी ठरला. पण, असं असूनही त्याची फी कोणत्याही ए-लिस्ट स्टारपेक्षा कमी नाही. जाणून घेऊयात त्याची संपत्ती किती?

2/10
GQ इंडियाच्या मते, अक्षयची एकूण संपत्ती 148 कोटी रुपये आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरताना दिसत आहे. इंडस्ट्रीमध्ये यशस्वी कारकीर्द असूनही, अक्षय खन्नाचं अद्याप लग्न झालेले नाही. वयाच्या 50 व्या वर्षीही तो अविवाहित आहे. तर विक्की कौशलची एकूण संपत्ती 140 कोटी रुपये आहे.

3/10
अक्षय खन्ना एकेकाळी बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून ओळखला जायचा. बॉलिवूडमध्ये त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याची कारकीर्द जसजशी पुढे सरकत गेली, तसतसा तो अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दिसला. पण, तरीही तो एकही हिट चित्रपट देऊ शकला नाही. आम्ही तुम्हाला त्याच्या कारकिर्दीची एक झलक दाखवणार आहोत. अक्षयनं अनेक अयशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी, तो अजूनही कोणत्याही ए-लिस्टर अॅक्टरएवढंच मानधन घेतो.

4/10
अक्षय खन्ना दिवंगत बॉलिवूड स्टार विनोद खन्ना आणि गीतांजली यांचा लहान मुलगा. त्याचा जन्म 28 मार्च 1975 रोजी मुंबईत झाला. विनोद खन्ना यांचा मोठा मुलगा राहुल खन्ना देखील एक अभिनेता आहे. अक्षय खन्नानं बॉम्बे इंटरनॅशनल स्कूल, बाबुलनाथ इथून शिक्षण घेतलं.

5/10
त्यानंतर अक्षय खन्नानं लॉरेंस स्कूल, लवडेल, ऊटी इथून एचएससी केली. एका मुलाखतीमध्ये अक्षय खन्नानं सांगितलं की, अभ्यासापेक्षा त्याला जास्त खेळांत होती. अक्षय खन्नानं आपल्या करिअरची सुरुवात आपले वडील विनोद खन्ना यांची फिल्म 'हिमालय पुत्र'(1997) मधून केली होती.

6/10
2010 पासून मात्र, अक्षय खन्ना चित्रपटांबद्दल खूप निवडक झाला आणि त्यानं निवडक चित्रपटांमध्ये काम केलं. 'छावा'पूर्वी तो दृश्यम 2 मध्ये दिसला होता आणि या चित्रपटासाठी त्यानं 2.5 कोटी रुपये घेतल्याचं वृत्त आहे. आता तो 'छावा' मध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत दिसला, ज्यासाठी त्यानं अडीच कोटी रुपये घेतल्याचं सांगितलं जात आहे.

7/10
करिअरच्या सुरुवातीला फ्लॉपचा शिक्का बसूनही अक्षय खन्नाला जेपी दत्ता यांचा बॉर्डर (1997) सिनेमा मिळाला. फिल्ममध्ये अक्षयनं धर्मवीरची भूमिका साकारली आणि त्याची भूमिका लोकांना खूपच आवडली. बॉर्डर 1997 ची सर्वात हीट फिल्म ठरली. त्यानंतर अक्षय खन्नानं ताल (1999), दिल चाहता है (2001), हमराज (2002), हंगामा (2003) हलचल (2004), आणि रेस (2008) सह अनेक हिट फिल्म्समध्ये काम केलं.

8/10
27 वर्षांच्या कारकिर्दीत अक्षयनं अनेक फ्लॉप चित्रपट दिलं, ज्यात ढिशूम, इत्तेफाक, द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, दीवार, सलाम-ए-इश्क, नाकाब, गांधी माय फादर, शॉर्ट कट - द कॉन इज ऑन, डोली सजाके रखना, कुदरत आणि आप की खतीर यांचा समावेश आहे.

9/10
एकीकडे, अक्षय अनेक फ्लॉप चित्रपट देत असताना, दुसरीकडे, त्याचं टक्कल पडलं. ऐन तारुण्यात हँडसम हंक म्हणून ओळख असलेल्या अक्षयच्या डोक्यावरचे भुरभुरणारे केस गेले. या समस्येशी बराच काळ तो झुंजत होता. असं म्हटलं जातं की, ताण-तणावामुळे त्याच्या लूकमध्ये खूप बदल झाला होता. त्याच्या टक्कल पडल्यामुळे तो नैराश्यात गेला.

10/10
मिड डेला दिलेल्या मुलाखतीत अक्षयनं त्याच्या लूकबद्दल आणि अकाली टक्कल पडण्याबद्दल खुलासा केला. त्या काळात त्यानं सांगितलं की, त्याचे केस खूप लहान वयातच गळू लागले. या परिस्थितीमुळे तो इतका निराश झाला की, त्याचा आत्मविश्वास डळमळीत झाला. दरम्यान, त्यानं सत्य स्वीकारले आणि त्याच्या कामावर अधिक मेहनत घेतली.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   

नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा

राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना

स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 

ABP Premium

व्हिडीओ

City 60 | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 18 March 2025 : 9 PmNagpur Violance Ground Report : नागपूरमध्ये हिंसाचार, नागरिकांचं प्रचंड नुकसान; आजची स्थिती काय? पाहुया ग्राऊंड रिपोर्टJob Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर भरती? शैक्षणिक पात्रता काय? 18 March 2025Prashant Koratkar Lawyer PC : जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी प्रशांत कोरटकरला अटक होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक

नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार

Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
Embed widget