एक्स्प्लोर
Swara Bhaskar: "500 वर्षापूर्वीच्या हिंदूंचा छळ पाहून भावुक होतायत…"; 'छावा'बाबत स्वरा भास्कर म्हणाली असं काही की,...
Swara Bhaskar Post Criticizing Society Chhaava Movie: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) जेवढी तिच्या चित्रपटांसाठी ओळखली जाते, तितकीच ती तिच्या परखड, स्पष्ट वक्तव्यांसाठीही ओळखली जाते.

Swara Bhaskar Post Criticizing Society Chhaava Movie
1/11

अभिनेत्री अनेकदा विविध विषयांवर पोस्ट करत सोशल मीडियावर वक्तव्य करत असते. आता स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती, 'छावा' चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे...
2/11

स्वरा भास्करनं सध्या गाजत असलेल्या 'छावा' चित्रपटावर एक ट्वीट केलं आहे. स्वराचं ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच, या ट्वीटवरुन दोन भिन्न प्रतिक्रिया समोर येत आहेत.
3/11

'छावा' चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांची कारकिर्द आणि औरंगजेबाशी त्यांनी दिलेला लढा, याचं चित्रण करण्यात आलं आहे.
4/11

छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मुघल बादशाह औरंगजेबानं त्यांना हालहाल करुन मारलं, याचंही चित्रण 'छावा'मधून करण्यात आलं आहे.
5/11

अशातच 'छावा' चित्रपटात आपल्या राजाचा केलेला छळ अनेकांना पाहावला गेलेला नाही. त्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर, अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
6/11

अनेकजणांनी चित्रपट पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तर, या चित्रपटात विक्की कौशलनं साकारलेल्या भूमिकेचं सर्वांनी तोंड भरुन कौतुक केलं आहे.
7/11

नेमकं याच मुद्द्यावरुन स्वरा भास्करनं निशाणा साधला आहे. यावर तिनं एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये तिनं 'छावा' चित्रपट आणि प्रयागराजमधली चेंगराचेंगरी यांचा संबंध एकमेकांशी जोडून निशाणा साधला आहे.
8/11

ट्वीटमध्ये स्वरा भास्करनं म्हटलंय की, "चेंगराचेंगरी आणि गैरव्यवस्थापनामुळे भयानक मृत्यू होतात. ते मृतदेह जेसीबी बुलडोझरने काढले जात असल्याचा आरोप होतो. यापेक्षा, जो समाज चित्रपटात दाखवलेला 500 वर्षांपूर्वीच्या हिंदूंचा छळ पाहून भावुक होतो, तो समाज बुद्धीनं आणि आत्म्याने मृत पावलेला समाज आहे.."
9/11

प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी हजेरी लावली होती. या कुंभमेळ्यात काही ठिकाणी आग लागल्याची, तर काही ठिकाणी चेंगराचेंगरीची घटना घडली होती.
10/11

अचानक घडलेल्या या दुर्घटनांमध्ये अनेक नागरिकांनी जीव गमावल्याचं समोर आलं आहे. नेमकं याच मुद्द्यावर स्वरा भास्करनं बोट ठेवलं आहे.
11/11

विक्की कौशलचा 'छावा' सिनेमा शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे.
Published at : 20 Feb 2025 10:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion