एक्स्प्लोर

मुंबई पोलीस उतरले निवडणुकीच्या रिंगणात, उमंग पॅनलने उधळला विजयाचा गुलाल, अख्खं पॅनल निवडून आलं

Mumbai police credit society Election : बृहन्मुंबई पोलीस पगारदार पतसंस्थेच्या निवडणुकीत उमंग पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

Mumbai Police Credit Society Election : तुम्ही आतापर्यंत सर्वसामान्य ते निवृत्त अधिकाऱ्यांना निवडणूक (Election) लढवल्याचे ऐकले असेल पण मुंबई पोलिसांनीही (Mumbai Police) निवडणूक लढवल्याचे तुम्ही ऐकले आहे का? मुंबई पोलीसही निवडणूक लढतात. पण, स्वतःच्या पगारदार पतसंस्थेसाठी. गेल्या 100 वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या बृहन्मुंबई पोलीस पगारदार पतसंस्थेच्या निवडणुकीत (Brihanmumbai Police Karmachari Pagardar patsanshta Election) मुंबई पोलिसांचे विविध पॅनेल उभे होते. त्यात दादा सलगर यांच्या पॅनलने बाजी मारली. उमंग पॅनलचे (Umang Panel) सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. या पतसंस्थेतील 28,060 सभासद निवडणुकीकरता पात्र होते. त्यापैकी 10,949 मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला. 

मुंबई पोलिसांच्या बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई या पतसंस्थेची 3 ऑगस्ट 1920 रोजी स्थापना करण्यात आली होती. मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त या पतसंस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मात्र सदर पतसंस्थेतील इतर 13 सदस्यांच्या पदासाठी दर ५ वर्षांनी निवडणूक घेतली जाते. मात्र, कोरोना काळात निवडणूक घेणे शक्य नसल्याने तत्कालीन उमंग पॅनलला पुढे मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत संपल्याने पुन्हा निवडणूक पार पडली. 

पाच पॅनल निवडणुकीसाठी होते रिंगणात 

या पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी एकूण 32,000 सदस्यांपैकी 28,060 सदस्य मतदानास पात्र होते. प्रत्येकी 13 उमेदवार असलेले 5 पॅनल एकमेकांविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी उभे राहिले होते. उमंग, संजीवनी, परिवर्तन, दक्षता आणि समर्थ असे पाच पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. मुंबईतील सर्व 99 पोलीस ठाणे, विशेष शाखा कार्यालये, पोलीस आयुक्त कार्यालयातील विविध विभाग, पोलीस महासंचालक कार्यालय तसेच इतर कार्यालये पात्र उमेदवारांनी पिंजून काढली होती. 10,949 मतदारांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवला. त्यामुळे या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  

उमंग पॅनलने रचला इतिहास

या निवडणुकीत एकूण 73 उमेदवार निवडणूक लढवत होते. त्यापैकी उमंग पॅनलचे 13 पैकी 13 उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. उमंग पॅनलने सलग दुसर्‍यांदा विजय मिळवून इतिहास रचला आहे. उमंग पॅनलचे दादा सलगर यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pakistan Cricketer Brother Nadeer Khan: स्वत:च्या देशाने वाऱ्यावर सोडलं; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भाऊ मुंबईत मदतीसाठी फिरतोय दारोदार! नेमकं काय प्रकरण?

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: अपात्र लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांवर, 1500 रुपये बंद होणार, दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Embed widget