Tata EV : टाटा ईव्हीचा 2 लाख विक्रीचा टप्पा पार, ग्राहकांचे आभार मानत कारच्या किमतीवर नव्या ऑफर
Tata EV Offer : एक्स्चेंज बोनस, आजीवन बॅटरी वॉरंटी आणि 100 टक्के ऑन-रोड फायनॅन्स पर्यायांसह अनेक ऑफर्स टाटा ईव्हीकडून देण्यात येत आहेत.

मुंबई : भारतातील ईव्ही क्रांतीचे प्रणेते आणि आपल्या २ लाखांहून अधिक ईव्हीची विक्री करणारे भारतातील ईव्ही मार्केटमधील अग्रणी टाटा ईव्हीने आपले यश साजरे करण्यासाठी उत्सवाची सुरुवात केली आहे. यामध्ये आपल्या ग्राहकांचे आभार मानून त्यांनी येत्या ४५ दिवसांसाठी काही खास मर्यादित मुदतीचे लाभ देऊ केले आहेत. नव्या ग्राहकांना या शाश्वत आणि उत्सर्जन-मुक्त इलेक्ट्रिक गतिशीलता अंगिकारण्यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच विद्यमान टाटा मोटर्सच्या वाहनांचे मालक आणि अन्य इलेक्ट्रिक वाहनांचे मालक यांना नवीन ईव्ही घेऊन उपग्रेड होण्याची संधी देण्याचा त्यांचा मानस आहे.
टाटा.ईव्हीच्या २ लाखांपेक्षा जास्त संतुष्ट ग्राहकांनी अवघ्या ५ वर्षात एकत्रितपणे ५ बिलियन कि.मी. पेक्षा जास्त अंतर कापून ७ लाख टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यात योगदान दिले आहे. त्यामुळे ईव्ही क्षेत्रात सर्वाधिक चार चाकी (४-व्हिलर्स) विकणारी कंपनी म्हणून कंपनीने या श्रेणीमध्ये सुरुवातीपासून असलेले आपले नेतृत्व आणखी बळकट केले आहे. त्यांच्या ८००० पेक्षा जास्त ईव्ही यूझर्सनी १ लाख किमी. पेक्षा जास्त अंतर आपल्या इलेक्ट्रिक वाहनावरून कापले आहे. यावरून टाटा.ईव्हीचा उत्पादन पोर्टफोलिओ आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट मूल्य प्रस्ताव देत असल्याचे दिसून येते.
या व्यतिरिक्त, टाटा.ईव्ही एक अशी ईकोसिस्टम विकसित करण्यात सक्रिय गुंतवणूक करत आहे, ज्याच्या माध्यमातून सामान्य जनांसाठी ईव्ही टेक्नॉलॉजी सहज प्राप्य होईल. कंपनीने अलीकडेच २०२७ पर्यंत ४००,००० पेक्षा जास्त चार्जिंग पॉईंट्स इंस्टॉल करून भारतातील सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर दुपटीने वाढवण्याचे प्रयत्न करत असल्याचे घोषित केले आहे. सतत आपल्या कक्षा रुंदावून आणि इनोव्हेशन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाजार विकासावर ध्यान केंद्रित करून टाटा.ईव्ही गतीशीलतेच्या भवितव्याला आकार देत आहे आणि एकामागून एक मैलाचे दगड मागे टाकत भारताच्या जागतिक ईव्ही आकांक्षांच्या अनुरूप काम करत आहे.
या ४५ दिवसीय महोत्सवाचा एक भाग म्हणून टाटा.ईव्हीने आपली आवडती टाटा ईव्ही विकत घेऊ इच्छिणाऱ्या वर्तमान ग्राहकांच्या आणि नवीन ग्राहकांच्या फायद्यासाठी अनेक लाभ खुले केले आहेत. या लाभांमध्ये एक्स्चेंज बोनस, आजीवन बॅटरी वॉरंटी आणि १००% ऑन-रोड फायनॅन्स पर्याय आहेत. चार्जिंगची सोय वाढवण्यासाठी कंपनीने कोणत्याही टाटा पॉवर चार्जिंग स्टेशनवर ६ महीने मोफत चार्जिंगचा लाभ देऊ केला आहे आणि आता कंपनी ईव्हीच्या खरेदीसोबत ७.२ केडब्ल्यू एसी फास्ट होम चार्जरचे इन्स्टॉलेशन मोफत करून देत आहे.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल अधिकारी विवेक श्रीवत्स म्हणाले, “इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात आमची सुरुवात भारताला स्मार्ट, सुरक्षित आणि मूलतः हरित अशा सार्थक मोबिलिटीच्या भविष्याकडे घेऊन जाण्याच्या एक धाडसी आणि दूरदर्शी वचनबद्धतेसह झाली. २०२० मध्ये Nexon.ev च्या अनावरणानंतर आम्ही भारताच्या रस्त्यांवर २ लाखापेक्षा जास्त टाटा ईव्ही दाखल करून ईव्हीच्या अंगिकारास नवीन उंचीवर पोहोचवले आहे, ज्यामुळे भारताचा सर्वात मोठा ईव्ही ४-व्हीलर निर्माता म्हणून आमची स्थिती मजबूत झाली आहे. आमचे हे यश आम्ही या ईकोसिस्टममधील आमच्या भागीदारांशी म्हणजे डीलर्स, पुरवठादार, चार्ज पॉइंट ऑपरेटर्स आणि मुख्यत्वे आधुनिक टेक्नॉलॉजीचे लोकशाहीकरण करण्याच्या आमच्या व्हिजनवर विश्वास दाखवणाऱ्या आमच्या ग्राहकांसोबत सामायिक करत आहोत. हे विशेष लाभ दाखल करून या क्रांतीमध्ये अधिकाधिक ग्राहकांना आम्ही आमंत्रित करत आहोत आणि हे आश्वासन देत आहोत की आम्ही एका स्वच्छ, हरित भविष्यासाठी एक टेक्नॉलॉजी म्हणून ईव्हीच्या विक्रीस प्रोत्साहन देण्याबाबत समर्पित राहू."
टाटा मोटर्सच्या ईव्ही समुदायाला सध्या जे इन्सेंटिव्ह्ज देण्यात येत आहेत, त्या व्यतिरिक्त ५०,००० रु. पर्यंत लॉयल्टी बोनस ऑफर करून टाटा.ईव्ही आपल्या ईव्ही समुदायाचे ऋण व्यक्त करत आहे. यामुळे टाटा मोटर्स पॅसेंजर आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे वर्तमान ग्राहक अपग्रेड करून ईव्ही खरेदी करू शकतात आणि अधिक हरित भविष्याच्या दिशेने भारताच्या सुरू असलेल्या प्रवासाला गती देऊ शकतात.
२ लाख टाटा.ईव्ही उत्सवाचा एक भाग म्हणून उपलब्ध असलेल्या लाभांमध्ये कोणत्याही पॅसेंजर वाहनावर ५०,००० रु. पर्यंत एक्स्चेंज बोनस, ईव्हीच्या पहिल्या खरेदीवर बॅटरीची आजीवन वॉरंटी (१६०,००० किमी. पर्यंत मर्यादित), १००% ऑन-रोड फायनॅन्स मिळावा यासाठी शून्य डाऊन पेमेंटची सोय, टाटा पॉवरसोबत ६ महिन्यांपर्यंत मोफत चार्जिंगचा लाभ, ईव्हीच्या खरेदीसोबत ७.२ केडब्ल्यू एसी फास्ट होम चार्जर आणि घरी त्याचे इन्स्टॉलेशन विनामूल्य आदींचा समावेश आहे.
या लाभांव्यतिरिक्त टाटा मोटर्स पॅसेंजर आणि इलेक्ट्रिक वाहनाच्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यात वर्तमान टाटा.ईव्ही ग्राहकांना नेक्सोन.ईव्ही आणि कर्व्ह.ईव्हीच्या खरेदीवर ५०,००० रु. चा लॉयल्टी बोनस तसेच वर्तमान टाटा मोटर्सच्या पॅसेंजर वाहनांच्या ग्राहकांना नेक्सोन.ईव्ही आणि कर्व्ह.ईव्हीच्या खरेदीवर २०,००० रु. चा लॉयल्टी बोनसचा समावेश आहे.
ही बातमी वाचा:























