एक्स्प्लोर
Royal Wedding Jordan : जॉर्डनच्या राजकुमाराचा शाही थाटात विवाह संपन्न, सौदीच्या शाही परिवाराशी जोडलं नातं; पाहा फोटो
Crown Prince Al Hussein Wedding: शुक्रवारी जॉर्डनचे राजकुमार क्राऊन प्रिन्स यांचा शाही थाटात विवाह संपन्न झाला. सौदी अरब घराण्याच्या राजकुमारी रजवा अल सैफ हिच्याशी त्यांचा विवाह झाला आहे.

Crown Prince Al Hussein Wedding
1/12

सध्या या अरबी राजकुमार-राजकुमारीचा शाही विवाह चर्चेचा विषय बनला आहे. या विवाह सोहळ्याला जगभरातील रॉयल घराण्यातील आणि इतर व्हीआयपी पाहुण्यांनी सहभाग घेतला होता. तसेच सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या विवाहाच्या स्वागतासाठी रस्त्यावर गर्दी केली होती.
2/12

28 वर्षीय जॉर्डनचे राजकुमार क्राऊन प्रिंस हुसैन यांचा विवाह राजकुमारी रजवा अल सैफ यांच्याशी झाला आहे. रजवा या 29 वर्षाच्या आहेत.
3/12

या दोघांचा विवाह जॉर्डनची राजधानी अम्मान येथील एका महलात संपन्न झाला. यावेळी दोन्ही घराण्यातील सदस्य आणि इतर नातेवाईकांची उपस्थिती होती.
4/12

राजकुमाराच्या या शाही विवाहामध्ये ब्रिटनचे प्रिंस विल्यम, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जील बायडेन या देखील उपस्थित होत्या. याशिवाय इतर अनेक देशांच्या महत्वाच्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
5/12

क्राऊन प्रिंस हुसैन आणि राजकुमारी रजवा अल सैफ यांच्या विवाहाचे फोटो मुस्लिम देशांत व्हायरल झाले आहेत.
6/12

सध्या जॉर्डन संसाधनाच्या कमतरेचा सामना करत आहे. त्यामुळे हा देश गरीब देशात गणला जातो. तर सौदी अरब खनिज तेलाने समृद्ध आणि श्रीमंत देश आहे. या नात्यामुळे दोन्ही देशात जिव्हाळा निर्माण होईल, त्याचा जॉर्डनला खूप फायदा होऊ शकतो.
7/12

या शाही विवाहाला ऐतिहासिक मानलं जात आहे. अरब देशातील राजकीय अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, या नातेसंबधामुळे दोन्ही देशातील संबंध आणखीन मजबूत होतील.
8/12

अरब देशातील राजकीय अभ्यासक आमेर सबालाईह यांनी सांगितल्यानुसार, 'हा फक्त एक विवाह नाही, ही जॉर्डनच्या भावी राजाची झलक दिसते.
9/12

या फोटोजमध्ये पाहू शकता की, जॉर्डनच्या राजपुत्राशी सौदी अरेबियाची राजकुमारीला विवाहादरम्यान कशी सजवण्यात आली आहे.
10/12

या फोटोत वधूने सुंदर पांढरा शुभ्र पोशाख परिधान केलेला आहे. 1968 च्या रोल्स-रॉईस फँटम व्हीमध्ये झहरान पॅलेसमध्ये वधू येताच लोकांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.
11/12

या दोघांच्या विवाहाचा शाही ताफा जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारो लोक उभं राहून झेंडे फडकावत होते. यावेळी देशभरात जल्लोषाचे वातावरण दिसून आलं.
12/12

मूळच्या अरबी वंशाच्या असलेल्या आणि सध्या नासामध्ये काम करणाऱ्या आयत उमर यादेखील विवाहसोहळ्याला उपस्थित होत्या.
Published at : 02 Jun 2023 06:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
