HSRP Register Fake Website : धक्कादायक! एचएसआरपी नंबर प्लेटसाठी बनावट संकेतस्थळ; सायबर भामट्यांच्या फसवणुकीचा नवा प्रकार उघड
HSRP Fake Website : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्याच्या सरकारच्या निर्देशांचा गैरफायदा घेत सायबर फसवणुकीच्या नव्या प्रकरणांचा उलगडा झाला आहे. आधी बनावट लिंकद्वारे फसवणूक केली जात होती.

मुंबई : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसवण्याच्या सरकारच्या निर्देशांचा गैरफायदा घेत सायबर फसवणुकीच्या नव्या प्रकरणांचा उलगडा झाला आहे. आधी बनावट लिंकद्वारे फसवणूक केली जात होती. मात्र, आता सायबर भामट्यांनी थेट सरकारी संकेतस्थळासारखे बनावट संकेतस्थळ तयार केले असून, त्याद्वारे नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे.
मुंबई पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार, एचएसआरपी नंबर प्लेटसाठी बनावट लिंकद्वारे फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला होता. सहाय्यक परिवहन आयुक्तांनी 5 मार्च रोजी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर फसवणूक करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला.
‘बुक माय एचएसआरपी डॉट कॉम’ संकेतस्थळावरुन फसवणूक
मात्र, सायबर गुन्हेगारांनी आता अधिक गंभीर पाऊल उचलत थेट सरकारी संकेतस्थळाच्या नावाशी साधर्म्य असलेले बनावट संकेतस्थळ तयार केले आहे. ‘बुक माय एचएसआरपी डॉट कॉम’ या नावाने हे संकेतस्थळ उभारण्यात आले असून, त्याद्वारे नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. प्राथमिक तपासणीत हे संकेतस्थळ राजस्थानमधून चालवले जात असल्याचे समोर आले आहे.
'या' फेक वेबसाईटपासून सावधान
https://bookmyhssp.inmaharahtra.html
-https://bookmyhsrp.com/registration
-https://www.bookmehsrp.com
-https://bookingmyhsrp.com
-https://indnumberplate.com
-https://hsrprto.in
या त्या 6 बनावट वेबसाईट असून नागरिकांनी अशा बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
HSRP नंबरप्लेट रजिस्टर करताना फक्त सरकारी वेबसाईटवरूनच ते रजिस्टर करा..
https://transport.maharashtra.gov.in ज्याच्या शेवटीला gov.in असेल तीच महाराष्ट्र सरकारची वेबसाईट आहे.
HSRP नंबरप्लेट रजिस्टर कसं करायचं?
01 एप्रिल 2025 नंतर राज्यातील सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलंय.. यासाठी रजिस्टेशन नेमकं कसं करायचं, त्याची प्रोसेस काय समजून घेऊयात..
1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना आता ३१ मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) सक्तीची करण्यात आलेली आहे. . त्यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सींची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया करून तसेच आपल्या शहरातील असलेल्या अधिकृत केंद्रामध्ये ती बसवून घेता येणार आहे.
त्यासाठी तुम्हाला गुगलवर hsrp number plate असं सर्च करायचं आहे. त्यानंतर सर्वात वर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची वेबसाईट transport.maharashtra.gov.in आली असेल. त्यावर क्लिक करा.. त्यानतंर तुमच्या समोर होम पेज आलं असेल...
आता तुमच्यासमोर Apply High Security Registration Plate Online असं पेज आलं असेल. त्यानंतर खाली तुम्हाला ऑफीस सर्च सिलेक्ट करायचं आहे. आता तुमच्यासमोर तीन पर्याय आले असतील. पण तुम्हाला APPLY HSRP यावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला Order HSRP यावर क्लिक करायचं... त्यानंतर तुम्हाला येथे गाडीचं Registration Number.. चेसीस नंबरचे शेवटचे पाच अंक ..इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक.. आणि मोबाईल नंबर टाकायचं आहे.. त्यानंतर पेमेंट करण्यासाठीचं पेज ओपन होईल..
त्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागतील.
दुचाकी, ट्रॅक्टर 450
तीनचाकी 500
चारचाकी, अन्य वाहने 745
रूपये आकारण्यात येईल...
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

