ShivJayanti 2025:सईबाईंचं बालपण जपलेला वाडा;थेट शिवरायांच्या सासरवाडीतून Phaltan Naik Nimbalkar Wada
साताऱ्यातील जाधवराव घराण्याचा, शिवरायांच्या कन्येचा वाडा पाहिल्यानंतर आता जाणार आहोत फलटणला... महाराणी सईबाईंचं बालपण ज्या वाड्यात गेलं तो फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचा वाडा पाहुया...
Narendra Modi On Shivjayanti 2025 नवी दिल्ली: छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट करत शिवरायांना अभिवादन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.


















