एक्स्प्लोर

Raj Thackeray MNS: राज ठाकरेंनी भाकरी फिरवली, मनसे पक्षसंघटनेत मोठे बदल, कोणाला कोणती जबाबदारी मिळाली?

maharashtra navnirman sena: मनसे पक्षसंघटनेत बदल करण्यात आले आहेत. मनसेत केंद्रीय समितीची स्थापना. शहराध्यक्ष पदाची निर्मिती. राज ठाकरे गुढीपाडव्याला काय बोलणार?

मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पक्षसंघटनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी रवींद्र नाट्यमंदिरात मनसेची बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेतील नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यानुसार फक्त विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत (MNS) आता शहर अध्यक्ष आणि उप-शहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार तर मुंबई पश्चिम उपनगराची जबाबदारी कुणाल माईणकर आणि मुंबई पूर्व उपनगराची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात आली आहे. तर अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीत स्थान देण्यात आले आहे. ही केंद्रीय समिती मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 

केंद्रीय समिती ही सर्व विभाग अध्यक्षांवर लक्ष ठेवेल. बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांच्याकडे मनसेच्या केंद्रीय समितीची विशेष जबाबदारी असेल. मुंबईच्या विभाग अध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नितीन सरदेसाई यांच्यावर  विशेष जबाबदारी असेल.

मनसेत 20 ते 25 हजार गटाध्यक्षांची संख्या

काय करायचं, कसं करायचं त्याची आखणी 2 एप्रिल पर्यंत सर्वांना मिळेल. शहर रचनेत कामांची रचना आहे काय करायचं आणि काय नाही करायचं, हे सांगितले जाईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. ज्याला जे काम दिलं तेच करायचं. त्यामुळे भांडणं कमी होतील, अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. अनेक गोष्टी साचल्या आहेत. ते सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

ठाण्यात मनसेची जबाबदारी कोणाकडे ?

ठाण्यात विभाग अध्यक्षांसाठी प्रकाश भोईर व राजु पाटील व अन्य महत्त्वाचे नेते असतील. ठाणे महापालिकांतील उपविभाग अध्यक्षांसाठी पुष्कर विचारे, गजानन काळे व अन्य पदाधिकारी समन्वयक असतील. तर अविनाश जाधव हे शाखाध्यक्षांसाठी निरीक्षक म्हणून काम करतील.

मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर

मनसेचा गुढीपाडवा मेळावा 30 मार्चला होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर हा मेळावा होईल. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

आणखी वाचा

महापालिका निवडणुकीत मनसे भाजपला टाळी देणार? मनसे बैठकीची इनसाईड स्टोरी 

महत्त्वाच्या बातम्या

Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार
Prithviraj Chavan on Eknath Shinde : एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा, पृथ्वीबाबा म्हणाले...
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget