एक्स्प्लोर
नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा केली. एक नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास राहिला असून गुरुवारी त्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

Rekha gupta corporator to Delhi CM
1/7

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा केली. एक नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास राहिला असून गुरुवारी त्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
2/7

रेखा गुप्ता ह्या संघविचारक राहिल्या असून विद्यार्थी संघटनेपासून त्या भाजप पक्षात कार्यरत आहेत. सन 1994-95 ला दौलत राम कॉलेजच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
3/7

सन 1995-96 मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या सचिव राहिल्या असून 1996-97 मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या अध्यक्षा देखील बनल्या होत्या.
4/7

रेखा गुप्ता सन 2003-2004 साली भाजप दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव झाल्या, त्यानंतर 2004-2006 ला युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव झाल्या.
5/7

भाजपकडून थेट सक्रिय राजकारणात त्यांनी एप्रिल 2007 मध्ये पाऊल टाकलं. दिल्लीतील उत्तरी पीतमपुरा वार्डमधून भाजपच्या नगरसेवक झाल्या.
6/7

2007-2009 महिला कल्याण आणि बाल विकास समितीच्या अध्यक्ष झाल्या. मार्च, 2010 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
7/7

सध्या रेखा गुप्ता ह्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष असून आजच त्यांच्या नावाची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा झाली. तर, परवेझ शर्मा दिल्लीचे उपमुख्यमंत्री असणार आहेत
Published at : 19 Feb 2025 08:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
मुंबई
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
