Chhatrapati Sambhajiraje : जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करणे हे भाषिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या अयोग्य असल्याची टीका छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करणे हे भाषिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या अयोग्य आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये "शिवजयंती दिनी श्रद्धांजली" असा उल्लेख केल्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी स्पष्ट सवाल केला आहे.'जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का?' जयंती हा साजरा करण्याचा, प्रेरणा घेण्याचा दिवस असतो. त्यामुळे अशा वेळी 'श्रद्धांजली' हा शब्दप्रयोग चुकीचा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या प्रकारावर इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवजयंती ही महाराजांच्या विचारांची पुनर्स्मृती करण्याची संधी असते, श्रद्धांजली नव्हे. त्यामुळे सार्वजनिक नेत्यांनी भाषेची आणि परंपरांची योग्य जाण ठेवून विचारपूर्वक शब्दप्रयोग करावा, असेही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींनी ही माफी मागितली पाहिजे- निलेश राणे
राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते चायनामध्ये असल्यासारखे वक्तव्य करतात. ते परदेशात गेले तरी भारताची बदनामी करतात. राहुल गांधी हे भारतीय नाहीत, केवळ त्यांचा पासपोर्ट आहे. ज्यांना आपली संस्कृती माहिती नाही, त्यांना जयंती आणि श्रद्धांजलीचा अर्थ कळत नाही. नेता म्हणण्याची एकही कॉलिटी राहुल गांधी यांच्याकडे नाही. त्यांनी आज महाराजांचा अपमान केलाय, त्यामुळे काँग्रेस पक्षांना माफी मागितली पाहिजे. राहुल गांधींनी ही माफी मागितली पाहिजे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली आहे.
गांधी परिवाराने केवळ नेहरू, गांधी आणि काँग्रेस विषयी बोलावं- प्रताप सरनाईक
राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती नसावं. गांधी परिवाराने केवळ नेहरू, गांधी आणि काँग्रेस विषयी बोलावं. देशातील आराध्य दैवत याबाबत त्यांनी काही बोलू नये, त्यांना काही माहिती नाही. राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी छत्रपती शिवरायांनी काय केले हे राहुल गांधींना माहिती नाही. त्यामुळे देशाच्या विरोधी पक्षाचे नेतृत्व करणारा व्यक्ती शिवरायांना अशी श्रद्धांजली वाहत असेल तर मी त्याचा धिक्कार करतो, मी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
