एक्स्प्लोर

शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन

मी 1972 पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यापासून ज्यांनी माझ्या स्वीय सहाय्यकाची जबाबदारी स्वीकारली ती तुकाराम धुवाळी यांनी.

मुंबई : सध्याच्या काळात नगरसेवकांना देखील पीए म्हणजेच स्वीय सहायक असतात. त्यामुळे, स्वीय सहायक ही नेतेमंडळींची गरज बनली आहे. राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात काम करत असताना आपल्या शासन व प्रशासनासंदर्भातील कामाचा लेखाजोखा ठेवण्यासाठी, मांडण्यासाठी विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी प्रत्येकाला हवा असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) हे गेल्या 60 वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून 55 वर्षांहून अधिक काळ ते संसदीय राजकारणात आहेत. त्यामुळे, त्यांच्याकडे देखील अनेक स्वीय सहायक (PA) गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. विशेष गेल्या 53 वर्षांपासून शरद पवारांचे स्वीय सहायक म्हणून काम करणाऱ्या तुकाराम धुवाळी यांचे आज निधन झाले. आपल्यासोबत 53 वर्षे सोबती राहिलेल्या, प्रत्येक क्षणात साथी बनलेल्या तुकाराम धुवाळी यांच्या निधनाबद्दल शरद पवारांनी दु:ख व्यक्त करत आठवणी जागवल्या आहेत.  

मी 1972 पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यापासून ज्यांनी माझ्या स्वीय सहाय्यकाची जबाबदारी स्वीकारली ती तुकाराम धुवाळी यांनी. विशेष म्हणजे ही जबाबदारी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहून सांभाळली. अतिशय विश्वासू, प्रामाणिक व सचोटीने वागणारा, नीगर्वी तसेच सतत हसतमुख असणारा, प्रत्येक व्यक्तीशी आदरानं वागणारा, प्रत्येकाचं काम पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणारा, अशा निराळ्या सहकाऱ्याचं देहावसान झालं, याचं मला अत्यंतिक दु:ख होतंय, अशा शब्दात शरद पवारांनी स्वीय सहायक धुवाळी यांच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या कामाचा व्याप जसा वाढत जातो तेव्हा अशी काही माणसं जवळ असावी लागतात की, ज्यांच्या सहकार्याने आपण निश्चिंतपणे वेगवेगळ्या प्रकारची कामं करु शकतो. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते निश्चिंतपणे, प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यात आपल्याला मागे वळून पाहावं लागत नाही, अशातीलच धुवाळी होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचं दु:ख होतंय, त्यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो असे शरद पवार यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. शरद पवारांनी तुकाराम धुवाळी यांचा फोटोही शेअर केला आहे. 

53 वर्षांपासून शरद पवारांचे स्वीय सहायक

दरम्यान, शरद पवार हे वयाच्या 27 व्या वर्षी आमदार बनून विधानसभेत पोहोचले होते. त्यानंतर, मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री, देशाचे कृषीमंत्री यांसारख्या मोठ्या पदांवर त्यांनी काम केलंय. त्यामुळेच, त्यांच्या या कामात त्यांचे सोबती राहिलेल्या धुवाळी यांनी अखेरच्या श्वासापर्यंत तब्बल 53 वर्षे शरद पवारांचे विश्वासू सहायक म्हणून काम पाहिले. 

हेही वाचा

रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री, भाजपकडून महिला नेत्याला संधी; नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget