एक्स्प्लोर
महाराष्ट्र, गुजरात की पंजाब? रशियन आर्मीमधील भारतीयांच्या भरतीमध्ये कोणते राज्य अव्वल?
Russian Army : भारतातूनही अनेक सैनिक रशियन सैन्यात भरती होतात. त्या ठिकाणी कामानिमित्त गेलेल्या तरुणांना जबरदस्तीने भरती करून घेतल्याचा आरोपही अनेकदा केला जातो.

Indians In Russian Army
1/8

रशियाची रशियन आर्मी जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी सेना आहे. सध्या रशियन सैन्यात 13 लाखांहून अधिक सक्रिय सैनिक आहेत. गेल्या काही वर्षांत त्यात आणखी वाढ झाली आहे.
2/8

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्या वर्षी रशियन सैन्यात 1 लाखांहून अधिक सैनिकांची भरती केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर सैनिकांची संख्या 15 लाखांच्या पुढे जाईल.
3/8

सध्या पंजाब व्यतिरिक्त केरळ, हरियाणा तसेच देशातील इतर लोकांना रशियन सैन्यात भरती करण्यात आले आहे. मात्र त्यांची अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाही.
4/8

भारतातील अनेक सैनिक रशियन सैन्यातही भरती होतात. त्यामध्येही भारतातील एका राज्यातून सर्वाधिक सैन्य हे रशियन सैन्यामध्ये भरती होतात.
5/8

आकडेवारीच्या आधारे बोलायचे तर रशियन सैन्यात पंजाबमधून सर्वाधिक सैनिकांची भरती केली जाते. यातील बहुतेक लोक अनिच्छेने रशियन सैन्यात सामील झाले आहेत.
6/8

जानेवारी 2025 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात रशियन सैन्यात काम करताना भारतातील 12 जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे म्हटले होते. याशिवाय आणखी 16 जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांनी रशियन सैन्यातही काम केलं आहे.
7/8

देशातील सर्व लोकांना रशियन लष्करातून बाहेर काढण्याची मागणी भारताने रशियाकडे केली आहे. यासोबतच त्यांना सुरक्षितपणे देशात परत पाठवण्यासही सांगण्यात आले आहे.
8/8

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही या मागणीला सहमती दर्शवली असल्याची माहिती आहे.
Published at : 19 Feb 2025 07:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
