एक्स्प्लोर
Rajabhau Waje : नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
Rajabhau Waje : शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Rajabhau Waje
1/9

राजाभाऊ वाजे यांनी काल शनिवारी (दि. 15) दिवसभर भाजपच्या नाशिकमधील वसंत स्मृती कार्यालयात भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची घेतली भेट घेतली.
2/9

खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
3/9

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा देखील झाली.
4/9

खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजप आमदार सीमा हिरे यांची देखील सदिच्छा भेट घेतली.
5/9

यावेळी सीमा हिरे आणि राजाभाऊ वाजे यांच्यात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली.
6/9

शहराचा विकास आणि आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात राजाभाऊ वाजे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
7/9

खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
8/9

भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, महेश हिरे, विजय साने, सुनील केदार यांची देखील राजाभाऊ वाजे यांनी भेट घेतली.
9/9

या भेटीबाबत राजाभाऊ वाजे यांनी म्हटलंय की, लोकप्रतिनिधी हा निवडून आल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांचा प्रतिनिधी असतो. नाशिकचा विकास आणि आगामी कुंभमेळा या दृष्टिकोनातून नाशिकच्या सर्वच लोकप्रतिनिधीनी एक टीम म्हणून काम केले तर आपल्याला चांगला विकास साधता येईल. तसेच कुंभमेळा देखील यशस्वी पद्धतीने पार पाडता येईल या भावनेतून आमदार व पदाधिकारी यांची भेट घेतली.
Published at : 16 Mar 2025 10:20 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पर्सनल फायनान्स
मुंबई
राजकारण


















