एक्स्प्लोर

Holi 2025: शिमगा! चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा, सण बांधीलकीचा.

- आकांक्षा जावडेकर

शिमगा... कोकणकरांचा जिव्हाळ्याचा सण. कोकणात शिमगा म्हटलं की एक वेगळाच उत्साह लहानांनपासून थोरांपर्यंत सर्वांगातून वाहायला लागतो. जसं गावकऱ्यांना ह्या सणाची आतुरता असते तीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक ओढ ही कोकणातून रोजगारनिमित्त मुंबईत गेलेल्या चाकरमान्यांना असते. खरं तर आपण कितीही  दूर गेलो तरी आपल्या गावाशी, तिथल्या मातीशी, तिथल्या निसर्गाशी आणि तिथल्या माणसांशी आपली नाळ जोडलेली असते. याचाच प्रत्यय होळीच्या सणात चाकरमान्यांना बघून येतो.  काळाच्या ओघात कोकणातला गावकरी शहरात गेला आणि जाताना गावाचं गावपण ही घेऊन गेला असं म्हणतात . पण असं असलं तरी गेलेले गावपण जपण्याचं काम देखील हाच चाकरमानी कित्येक वर्ष अगदी निष्ठेने करतोय. Time is money असं म्हणत चाकरमानी लाइफ रेस मध्ये धावत असला तरी वर्षातले काही दिवस ह्याच रेस मधून मुद्दाम मागे पडून, मशीन पासून disconnect होऊन हाच चाकरमानी आपल्या निसर्गाशी Reconnect होतो. 

कोकणातल्या चाकरमान्यांची पावलं प्रत्येक सणाला गावाकडे वळाल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गौरी गणपती असो दिवाळी असो किंवा दसरा असो. आणि ह्याच सणांच्या रेलचेलीनंतर पुढे येतो तो त्यांच्या जिव्हाळ्याचा शिमगोत्सव.
चाकरमानी आणि त्यांच्या गावाचा शिमगा यांच  एक अतूट असं नातं आहे. वर्षभर मन मोडून काम करणारा हा चाकरमानी वाट पाहत असतो तो शिमग्याची, तो वाट पाहत असतो गावातल्या आपल्या आप्तेष्टांच्या गाठीभेटींची, तो वाट पाहत असतो दहा दिवस माळावर होळी लावण्याची, तो वाट पाहत असतो रोज होळीत फाक घालण्याची, तो वाट पाहत असतो आपल्या गावदेवीची पालखी बेधुंदपणे नाचवण्याची आणि तो वाट पाहत असतो त्या सजवलेल्या पालखीतून मढवलेल्या देवाला आपल्या घरात आशीर्वाद द्यायला घेऊन येण्याची. खरंतर शिमगा या चाकरमान्यांसाठी का एवढा जिव्हाळ्याचा याचं कारण एका वाक्यात सांगायचं तर ते हे की वर्षभर आपण देवाच्या दारात जातो...पण शिमगा हा सण असा आहे जेव्हा देव त्यांच्या दारी येऊन या कोकणकरांना आशीर्वाद देतो. 

तसं पाहता होळीची परंपरा ही प्रत्येक गावा प्रमाणे थोड्या अधिक प्रमाणात बदलताना पाहायला मिळते. काही ठिकाणी होळीच्या काही दिवस आधीपासून शिमगोत्सव सुरू होतो तर काही ठिकाणी होळी पासून. होळी जवळ आली की गावाला एक प्रकारचा निराळच चैतन्य प्राप्त होतं. होळीच्या तयारीची धामधूम जिकडे तिकडे बघायला मिळते. गावातल्या मानकऱ्यांनी वर्षानुवर्ष जिवापाड जपलेल  एखादं झाड त्याची पूजा करून तोडलं जातं. एरवी झाडाच्या एका पानाला सुद्धा हात न लावून देणारा माणूस आनंदाने आणि मोठ्या अभिमानाने हे झाड तोडून घेऊन जातो. यामध्ये विशेषतः सुरमाड, आंबा, पोफळीचं झाड अश्या झाडांचा समावेश असतो. हे झाड मोठ्या जल्लोषात वाजत गाजत खांद्यावरून नाचवत होळीच्या माळावर नेऊन तिथे रोवलं जातं. त्याच्या बाजूने पूर्ण होळी रचली जाते. रात्री त्याची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होलिका दहन केलं जातं. होळी लावल्यावर तिच्या बाजूने रिंगणात फाक देत, पारंपरिक गाणी म्हणत फेऱ्या मारल्या जातात. याच दिवशी संपूर्ण गावातून शंकासुर आणि सोंगं नाचवली जातात. गोमुचा नाच होतो. काटखेळ खेळले जातात.

 याच रात्री गावदेवीची पालखी सजवली जाते. दुसऱ्या दिवशी देवीचा कौल घेऊन ही पालखी देवळातून सहाणेवर आणली जाते. मानकरी तिची यथोचित पूजा करतात. सजलेली पालखी आणि मढवलेल्या देवीचं रुप पाहून डोळ्याचं पारणं फीटतं आणि सर्वांगातून आनंद आणि श्रद्धेची लाट उसळून येते. पारंपरिक वाद्यघोषात ही पालखी संपूर्ण गावातून फिरवली जाते. नवस बोलले जातात, नवस फेडले जातात, ओट्या भरल्या जातात, गाऱ्हाणी घातली जातात एवढेच काय तर प्रत्येकजण आपल्या अंगणात पालखी खांद्यावर घेऊन  मनसोक्त बेधुंदपणे ती नाचवतात. आणि शेवटी अतिशय आनंदात पण पाणावलेल्या डोळ्यांनी गावकरी पालखी गावाच्या वेशीवर आणतात. पुन्हा पूजा होते. संपूर्ण गावच्या सुख समृद्धीसाठी देवीला गाऱ्हाणं घातलं जातं. मग खऱ्या अर्थाने हा शिमगा संपन्न होतो. 

शिमगा संपलेला असतो पण त्यातून मिळालेली अपरिमित ऊर्जा ही त्याला संपूर्ण वर्ष पुरून उरणारी असते. मग चाकरमान्यांची पावलं पुन्हा मुंबईच्या दिशेने वळतात. जड अंतःकरणाने परंतु अतिशय समाधानाने तो गाव सोडतो. पण हो तो या परंपरेची आणि संस्कारांची शिदोरी घेऊन ती तो आपल्याजवळ अगदी जबाबदारीने जपतो, वाढवतो आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द करत असतो.  थोडक्यात काय, कोकणातला माणूस शहराकडे वळला असला, चाकरमानी झाला असला तरी त्याच्यातलं गावपण आज देखील टिकून आहे. त्याच्या ध्यानीमनी नेहमीच आपलं गाव असतं.. कारण  शहरात येताना मुठीत घट्ट पकडलेली ती गावाची माती निसटून जायच्या आतच त्याचं गाव त्याला पुन्हा साद घालतं...येवा कोकण आपलाच असा!!!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Mallya : विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं, भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही म्हणाला, कोर्टात नवा कांगावा
भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही, विजय मल्ल्याचा नवा कांगावा, इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
ABP Premium

व्हिडीओ

Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान
Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Mallya : विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं, भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही म्हणाला, कोर्टात नवा कांगावा
भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही, विजय मल्ल्याचा नवा कांगावा, इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
रुग्णांच्या जीवाशी खेळ, ह्रदयविकाराची शक्यता; बीपीच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
Ishan Kishan: मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
मैदानात फटके देताच अन् इशान किशनची गर्लफ्रेंड सुद्धा पहिल्यांदाच समोर येताच पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून भलताच सर्च ट्रेंड समोर
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट!
Gopichand Padalkar : मुलीवर जबरदस्ती करुन व्हिडिओ केला, पोलिसांना, घरच्यांना व्हिडिओ पाठवला म्हणजे त्यांचं धाडस वाढतंय, गोपीचंद पडळकरांचा आरोप
जनआक्रोश मोर्चापूर्वी मुलीचा व्हिडिओ समोर आला; मुलीवर जबरदस्ती करत व्हिडिओ तयार केला, गोपीचंद पडळकरांचा आरोप
Embed widget