Aamir Khan Gauri Spratt Video: साठीचा आमिर खान गौरीचा हातच सोडेना; भर पार्टीत दिसला नव्यानं फुललेल्या प्रेमाचा बहर VIDEO
Aamir Khan Gauri Spratt Video: बॉलिवूड सुपरस्टारनं 13 मार्च रोजी मुंबईत मीडियासमोर आपला वाढदिवस साजरा केला आणि त्याचवेळी त्यानं त्याची प्रेयसी गौरीसह अनेक गोष्टींबद्दलही खुलासा केला.

Aamir Khan Gauri Spratt Video: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं (Aamir Khan) नुकतीच वयाची साठी गाठली. पण, त्याच्या साठाव्या वाढदिवशी चाहत्यांकडून शुभेच्छा, भेटवस्तूंचा स्विकार करण्याऐवजी त्यानंच चाहत्यांना एक सरप्राईज देऊन धक्का दिला. आमिरनं आपल्या 60व्या वाढदिवशी आपली नवी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओळख अख्ख्या जगाला करून दिली आणि सर्वांसमोर प्रेमाची कबुलीही दिली. दोन लग्न, त्यानंतर घटस्फोट आणि तीन मुलं असलेल्या साठ वर्षांचा आमिर खान चक्क रिलेशनशिपमध्ये असल्याच्या खुलासा झाला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
आमिर खाननं मीडियासमोर त्याची प्रेयसी गौरीची (Gauri Spratt) ओळख करून दिली आणि सांगितलं की, तो गेल्या 18 महिन्यांपासून तिला डेट करतोय. त्यानं म्हटलं की, तो अशा व्यक्तीच्या शोधात आहे, ज्याच्यासोबत तो शांतीनं राहू शकेल, जो त्याला आधार देऊ शकेल आणि ती व्यक्ती गौरी आहे. त्यानंतर आमिर अनेकदा गौरीसोबत दिसला. ज्यावेळी आमिरनं आपण रिलेशनमध्ये असल्याची कबुली दिली, त्यावेळी गौरी त्याच्या बाजूलाच बसली होती. पण, आमिरनं माध्यमांना फोटो न काढण्याची विनंती केली. त्यानंतर इरफान पठाणच्या वेडिंग अॅनिवर्सरीच्या पार्टीतही गौरी आमिरसोबत होती. अशातच आता सध्या दोघांचा एक नवा व्हिडीओ चर्चेत आहे.
View this post on Instagram
आमिरनं घट्ट पकडलेला गौरीचा हात
आमिर खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमिर गौरीचा हात पकडून फिरताना दिसत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये आमिर खान एका पार्टीमध्ये गौरीसोबत उपस्थित होता. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आमिरनं गौरीचा हात अगदी घट्ट पकडून ठेवलेला आहे. तो गौरीचा हात सोडायला तयार नाही.
Video व्हायरल झाल्यानंतर युजर्सकडून कमेंट्सचा पाऊस
आमिर आणि गौरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरनं लिहिलं आहे की, "चला, यावेळी तर नॉर्मल आहे...", तर आणखी एकानं लिहिलंय की, "सर्वसाधारणपणे आमिर खानची चॉईस तशी फारच बेकार होती, पण यावेळी आमिरनं स्वतःसाठी एक चांगली मुलगी शोधली आहे...", एका युजरनं लिहिलंय की, "यांचं सर्वकाही ठीक चाललं आहे...", तर आणखी एकानं लिहिलंय की, "चला, फायनली सुंदर मुलगी भेटली..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
