खोक्या भोसलेपेक्षा मोठे गुन्हेगार परदेशात लपून बसलेत, आपण पॉलिटिकली करेक्ट पण सोशली करेक्ट कधी होणार? सुषमा अंधारेंचा सवाल
खोक्या भोसलेवर केस होते आणि तो गुन्हेगार म्हणून त्याचं घर जाळून टाकलं जातं. खोक्यापेक्षा कित्येक मोठं मोठे गुन्हेगार राष्ट्रीयीकृत बँकांना चुना लावून परदेशात गेल्याचे वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलं.

Sushma Andhare : खोक्या भोसले नावाच्या व्यक्तीवर केस होते आणि तो गुन्हेगार म्हणून त्याचं घर जाळून टाकलं जातं. खोक्यापेक्षा कित्येक मोठं मोठे गुन्हेगार राष्ट्रीयीकृत बँकांना चुना लावून परदेशात गेले आहेत. खोक्या भोसले हा शोषीत प्रतिनिधी असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं. आपण पॉलिटिकल करेक्ट राहण्यापेक्षा सोशियली करेक्ट का राहू शकत नाहीत? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी लातूर येथील एका कार्यक्रमात उपस्थित केला आहे.
खोक्या भोसले नावाच्या व्यक्तीवर केस होते आणि तो गुन्हेगार आहे म्हणून त्याचं घर जाळून टाकलं जातं. पण त्याच्यापेक्षा कित्येक मोठे मोठे गुन्हेगार जे इथल्या राष्ट्रीयीकृत बँकांना चुना लावून परदेशात गेले त्यांची घरे काय त्यांची साधी गाडी सुद्धा जाळायची कोणाची हिम्मत होत नाही. फक्त तो खोक्या भोसले हा शोषीत प्रतिनिधी आहे म्हणून त्याच्याबद्दल हे होऊ शकतं अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी लातूरमध्ये दिले आहे. आपण सर्व पॉलिटिकली करेक्ट राहतो मात्र सोशली करेक्ट राहत नाही, असं राहणं कधी सुरू करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. लातूर येथे एका कार्यक्रमाला त्या उपस्थित होत्या. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्यांनी विविध विषयवर भाष्य केले.
नेमकं प्रकरण काय?
भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्याचे अनेक गुन्हेगारी व्हिडिओ समोर आल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्याला प्रयागराज येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. राज्याच्या वनविभागानं ही कारवाई केली. खोक्यानं वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन घर बांधल्याचा दावा केला आहे. खोक्या गुन्हेगार आहे म्हणून नव्हे तर त्यानं वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन घर बांधल्याचं सरकारनं म्हटलं आहे. वनखात्याच्या जागेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या घरावर बुलडोझर चालवण्यात आल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सतीश भोसले याच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हावी. पण आमचे घर पाडणाऱ्यांवरही सरकारने कारवाई करावी. सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी सतीश भोसले हिच्या बहिणीने केली आहे.
महत्वाच्या बातम्या:























