एक्स्प्लोर
Shiv Jayanti Wishes 2025 : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शिवभक्तांना द्या खास शुभेच्छा; महाराजांच्या शौर्याचं करा स्मरण, पाठवा 'हे' मेसेजेस
Shiv Jayanti Wishes 2025 : आज देशभरात शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी केली जातेय. या निमित्ताने शिवभक्तांना शुभेच्छा द्या.

Shiv Jayanti Wishes 2025
1/10

शूरता हा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे, क्षत्रिय हा माझा धर्म आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे... जय शिवराय!
2/10

चारी दिशांत ज्याचा गाजा-वाजा, एकच होता असा राजा, नाव त्याचं घेऊ किती म्हणतात त्याला छत्रपती! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
3/10

निधड्या छातीचा, दणकट कणांचा, मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा... शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
4/10

स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास रयतेचे सुख ही एकच मनी होती आस मुघलांनाही कधी न कळला त्याचा गनिमी कावा असा वाघिणीचा होता तो छावा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
5/10

"सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे, स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे, छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे!" शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
6/10

शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती, शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा, शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
7/10

जगणारे ते मावळे होते जगणारा तो महाराष्ट्र होता पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवरुन मायेने हात फिरवणारा राजा छत्रपती होता शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
8/10

श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यांत रोखली आग... देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ... शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
9/10

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
10/10

"रणांगण दणाणलं, सिंह गर्जला, मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं, पराक्रमाची गाथा लिहून गेला जो, तो एकच -छत्रपती शिवराय!" शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 17 Mar 2025 12:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion