एक्स्प्लोर
Raj Thackeray : राज ठाकरेंनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं, त्यानेच आता मनसेप्रमुखांना सुनावलं; कुंभमेळ्याच्या वक्तव्यावरुन पलटवार
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रयागराजमधील कुंभमेळ्याची खिल्ली उडवली होती.
Raj Thackeray
1/10

राज ठाकरे म्हणाले की, नुकतीच कोरोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहोत. कुणालाही कुणाचे देणेघेणे नाही.
2/10

आजवर मी कित्येक स्विमिंग पुलांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम केले. सुरुवातीला ते निळे होते, मात्र कालांतराने ते स्विमिंग पूल हिरवे होत गेले. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
3/10

एक नदी या देशातील स्वच्छ नाही. परदेशात ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस तिथल्या नद्या पाहतो तर त्या एकदम स्वच्छ असतात. आपण आपल्या इथे नद्यांना माता म्हणतो मात्र परदेशात असं होत नाही. तरीही त्या नद्या स्वच्छ आहेत. मात्र आपल्या इथल्या नद्यांमध्ये सर्व प्रदूषित पाणी सोडले जाते, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
4/10

राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. त्यानंतर राज कपूर यांनी चित्रपट काढला, लोकांना वाटले गंगा साफ झाली. पण त्यात वेगळी गंगा होती.
5/10

लोक म्हणाले अशी गंगा साफ असेल तर आम्हीही आंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा, असे आवाहन राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना केले.
6/10

आता राज ठाकरेंच्या वक्तव्यावर त्यांनी ज्या आमदाराला राजकारणात उभं केलं त्या राम कदम यांनीच राज ठाकरेंना सुनावलंय.
7/10

भाजप आमदार राम कदम म्हणाले की, 57 कोटी सनातनी हिंदू बांधवांनी कुंभमेळ्यात स्नान केलं, मी सुद्धा तीन वेळेस स्नान केलं, त्यांना ते पाणी अस्वच्छ वाटलं नाही?
8/10

प्रत्येकाचा विचार करण्याचा विषय आहे. कुंभमेळ्याच्या स्नानाला एक वैज्ञानिक कारण आहे. त्यामुळे त्याला अंधश्रद्धा म्हणून योग्य नाही, असे राम कदम यांनी म्हटले आहे.
9/10

कुंभमेळ्याला अनेक लोक आणि साधुसंत आले होते.
10/10

कुंभमेळ्यासंदर्भात असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे माझं म्हणणं असल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे.
Published at : 10 Mar 2025 04:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























