एक्स्प्लोर
Amelia Kerr : मुंबईला स्वत:च्या जिद्दीवर चॅम्पियन बनवणारी जगातील सर्वांत सुंदर क्रिकेटर 'या' दिग्गज खेळाडूला करतेय डेट; पाहा फोटो
Amelia Kerr : मुंबईला स्वत:च्या जिद्दीवर चॅम्पियन बनवणारी अन् सौंदर्याची खाण असलेली अमेलिया केर न्यूझीलंडच्या दिग्गज क्रिकेटपटूला डेट करत आहे.

Photo Credit - abp majha reporter
1/10

न्यूझीलंडची क्रिकेटर अमेलिया केर हिची गणना जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. केरने अलीकडेच न्यूझीलंडच्या T20 विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवाय नुकत्याच पार पडलेल्या महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL मध्ये मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवण्यात तिचा सिंहाचा वाटा होता.
2/10

क्रिकेटमधील कामगिरी बरोबरच अमेलियाच केरच्या सौदर्याची देखील सर्वत्र चर्चा असते. दरम्यान मागील काही काळात तिच्या लव्ह लाईफबद्दलही जोरदार चर्चा सुरु आहे. तिच्या मायदेशातील म्हणजेच न्यूझीलंडच्या पुरुष क्रिकेटरला ती डेट करत असल्याचे बोलले जात आहे.
3/10

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नेथन स्मिथ अमेलियाचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा रंगली आहे. 26 वर्षीय स्मिथ अष्टपैलू खेळाडू आहे. नुकताच भारताविरोधात पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात देखील खेळला होता. स्मिथला मॅट हेन्री जखमी झाल्यानंतर प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालं होतं.
4/10

नेथन स्मिथ आणि अमेलिया केर देशांतर्गत क्रिकेटमध्ये वेलिंग्टनकडून खेळतात. पण सध्या ते एकमेंकांना डेट करत असल्याच्या बातम्या खूप व्हायरल होत आहेत. कारण अलिकडच्या काळात दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करताना दिसले आहेत.
5/10

नॅथन स्मिथनेही अलीकडेच अमेलिया केरसोबतचे त्याचे प्रोफाइल फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. तो अनेकदा अमेलिया केरसोबतचे फोटो पोस्ट करताना पाहायला मिळालाय.
6/10

नेथन स्मिथ आणि अमेलिया केरने शेअर केलेले फोटो पाहिल्यानंतर ते दोघं एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यांनी दिलेल्या कॅप्शनमधून असेही दिसून आले आहे की ते खूप वेळ एकत्र घालवतात.
7/10

अमेलिया केरचं नाव याआधी 2021 मध्ये रग्बी खेळाडू रुबेनशी जोडलं जात होतं. त्याच्यासोबतचा बर्थडे पार्टीचा फोटोही त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. पण आता अमेलिया केर अनेकदा नॅथन स्मिथसोबत असताना दिसत आहे. फोटोवरून असे दिसते की दोघेही बऱ्याच एकमेकांना डेट करत आहेत. मात्र दोघांनीही अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
8/10

अमेलिया केर सध्या महिला प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसली होती. ती मुंबई इंडियन्स संघात प्लेईंग 11 मध्ये होती. तिच्या कामगिरीच्या जोरावरच मुंबईने पुन्हा एकदा चॅम्पिनय बनण्याचा पराक्रम केलाय.
9/10

मुंबई इंडियन्सने 2024 मध्ये अमेलियाला 1 कोटी रुपयांना खरेदी केले आणि 2025 साठी तिला कायम ठेवले होते.
10/10

अमेलिया केरच्या नात्याबद्दल मीडियामध्ये फारशी माहिती उपलब्ध नाही. पण दोघांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्यातील प्रेम सहज दिसून येते.
Published at : 16 Mar 2025 07:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
राजकारण
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion