Shukra Asta 2025 : शुक्राचा होणार अस्त, अवघ्या 3 दिवसांत पालटणार 5 राशींचं भाग्य; उत्पन्नाचे मार्ग होणार खुले
Shukra Asta 2025 : 19 मार्च रोजी शुक्र मीन राशीत अस्त होणार आहे. शुक्राच्या मीन राशीत अस्त होण्याने 5 राशींच्या लोकांना चांगलाच फायदा होणार आहे.

Shukra Asta 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, धन-धान्य, संपत्ती आणि प्रेमाचा कारक ग्रह म्हणून शुक्र ग्रह (Venus) ओळखला जातो. आता 19 मार्च रोजी शुक्र मीन राशीत अस्त होणार आहे. शुक्राच्या मीन राशीत अस्त होण्याने 5 राशींच्या लोकांना चांगलाच फायदा होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं अस्त होणं फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात सुरु असलेल्या समस्या लवकर संपतील. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. इतकंच नव्हे तर या काळात तुम्ही यात्रेला देखील जाण्याचा विचार करु शकता.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे राशी परिवर्तन फार शुभकारक ठरणार आहे या काळात तुमच्या जीवनात सुरु असलेल्या अडचणी लवकर संपतील. तसेच, तुम्हाला करिअरमध्ये अप्रत्यक्षपणे लाभ मिळेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला चांगला धनलाभ होईल. तसेच, व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. सासरच्या मंडळींकडून तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळेल.
मिथुन रास (Scorpio Horoscope)
मिथुन राशीसाठी शुक्राचा अस्त होणं फार सकारात्मक परिणाम देणारं असणार आहे. हा काळ तुमच्या नोकरी-व्यवसायासाठी फार चांगला काळ ठरणार आहे. तसेच, तुमच्या हातात एखादं नवीन प्रोजेक्ट लागण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबात सुख-शांती टिकून राहील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचं अस्त होणं फार लाबदायक ठरणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमच्या व्यवसायासाठी हा काळ चांगला असणार आहे. तसेच, जे बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं अस्त होणं फार लाभदायक ठरणार आहे. या कालावधीत तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होणार आहे. तसेच, तुम्हाला व्यवसायात चांगला लाभ मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, या काळात तुम्ही यात्रेला देखील जाऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Budh Asta 2025 : 24 तासांत बुध ग्रहाचा होणार अस्त, 17 मार्चपासून 'या' 3 राशींना सावधानतेचा इशारा; धनहानीसह होणार प्रचंड नुकसान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

