ऑफिसमध्ये एकमेकांना करंट बसण्याचे प्रमाण का वाढलंय, नेमकं कारण काय ?
Why Do We Feel Shock if Suddenly Touches Someone : ऑफिसमध्ये एकमेकांना करंट बसण्याचे प्रमाण का वाढलंय, नेमकं कारण काय ?

Why Do We Feel Shock if Suddenly Touches Someone : आपल्या दैनंदिन जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला जाणवतात पण त्याबद्दल आपण कधीच गांभीर्याने विचार करत नाही. काहीवेळा ऑफिसमध्ये किंवा घरी बसून काही काम करत असताना अचानक तुम्हाला कोणी स्पर्श केला तर विजेचा धक्का बसल्यासारखे वाटलंय का? ऑफिसमध्ये किंवा घरात असताना एकमेकांना करंट बसण्याचे प्रमाण का वाढलंय. यातून आपल्याला मोठी इजा होत नसली तर अचानक करंट नक्कीच बसतोय. यामागे नेमकं कारण काय ? जाणून घेऊयात..
आपल्या शरीराच्या नर्व्ह्जमध्ये सातत्याने प्रक्रिया होत असतात. आपल्या घरांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतात. उपकरणांमध्ये विद्युत प्रवाहासाठी ज्या तारा वापरल्या जातात. त्याच्यावर एक प्लॅस्टिकचे कोटिंग असते. त्याप्रमाणे शरिरातील नसांवर सुद्धा एकाप्रकारचं कोटिंग असतं. आपल्या एकाच स्थितीत बसून राहिलो तर या नसांमध्ये एका प्रकारचं असंतुलन निर्माण होतं. त्यावेळी शरिरातील इलेक्ट्रॉन्स डिस्टर्ब होतात आणि त्याला अचानक कोणी स्पर्श केला तर म्येलिन शीथ सक्रिय होतात. त्यामुळेच आपल्या शरिराला करंट लागल्यासारखं वाटतं.
न्यूरोलॉजिस्ट सांगतात, आपल्या शरीरात इलेक्ट्रिकल क्रिया सतत होत राहते. ज्याप्रमाणे घराला वीजपुरवठा करण्यासाठी वायरचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे तांब्याच्या तारेवर प्लास्टिकचा लेप लावला जातो. तशाच प्रकारे आपल्या शरीराच्या नसांवरही कोटींग असते. वैद्यकीय भाषेत याला म्येलिन शीथ म्हणतात. जेव्हा तुम्ही दीर्घकाळ एकाच स्थितीत राहता तेव्हा म्येलिन आवरण कधीकधी असंतुलित होते आणि तुम्हाला करंट लागल्यासारखं वाटू लागतं.
डॉक्टर सांगतात की, करंट बसणे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते, काही लोकांसाठी काही फरक पडत नाही. ते त्यांच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असते. प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसलेला असून देखील करंट बसल्याचे तुमच्यासोबत अनेकदा घडले असेल. हे घडते कारण जेव्हा आपण प्लास्टिकच्या खुर्चीवर बसतो आणि आपले पाय जमिनीला स्पर्श करत नाहीत. त्या वेळी प्लास्टिकची खुर्ची आपल्या कपड्यांमधून इलेक्ट्रॉन गोळा करते आणि त्यात पॉझिटिव्ह चार्ज जमा होतो आणि तुम्ही खुर्चीवरून उठताच हा चार्ज खुर्चीच्या दिशेने सरकतो आणि त्या वेळी खुर्चीला स्पर्श केल्याने तुम्हाला थोडा करंट जाणवू लागतो. (Why Do We Feel Shock if Suddenly Touches Someone)
इतर महत्त्वाच्या बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























