Zaheer Khan : 20 वर्षे झाले तरी प्रेम कायम, जहीरवर जीव ओवाळून टाकणारी 'ती' तरुणी पुन्हा दिसली; I Love You म्हणताच...Video
Zaheer Khan meet old fan : तीच तरुणी तेच लाजणं, 20 वर्षांपूर्वी झळकलेली 'ती' तरुणी पुन्हा दिसली; झहीर खानला I Love You म्हणत पुन्हा केलं प्रपोज!

Zaheer Khan meet old fan : भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान सध्या लखनौ सुपर जायंट्सचा कोच म्हणून जॉईन होण्यासाठी पोहोचलाय. दरम्यान, लखनौचा मेंटॉर म्हणून प्रवास करत असताना जहीर खानला 20 वर्षांपूर्वी भेटलेली महिला फॅन पुन्हा एकदा भेटली आहे. याच चाहतीने 2005 मध्ये लाईव्ह मॅच सुरु असताना जहीरला प्रपोज केलं होतं. यावेळी तीच तरुणी तेच लाजणं अन् तेच I Love You 20 वर्षांनंतरही पुन्हा दिसलं. त्यामुळे जहीर देखील अचंबीत झालेला पाहायला मिळालाय. खरं तर, 2005 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील TVS कप टेस्ट मालिकेदरम्यान, 'आय लव्ह यू झहीर' असे फलक असलेली चाहती व्हायरल झाली होती. त्या सामन्यादरम्यान युवराज सिंगने झहीरला त्या चाहतीबद्दल खूप डिवचले होते.
View this post on Instagram
दरम्यान, त्याचवेळी भारतीय वेगवान गोलंदाज जहीर खान याने चाहती असलेल्या फ्लाईंग किस देखील दिले होते, ज्यामुळे ती थोडं अम्बॅरसिंग फिल करत होती. आता 20 वर्षांनंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये झहीर खान पुन्हा त्या चाहतीला भेटताना दिसत आहे.पुन्हा एकदा त्या चाहतीच्या हातात 'आय लव्ह यू झहीर', असलेले पाहायला मिळाले. हे पाहून झहीरलाही आश्चर्य वाटले.
लखनौ सुपर जायंट्सने शेअर केला जहीरचा व्हिडीओ
लखनौ सुपर जायंट्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. झहीरने हॉटेलमध्ये प्रवेश करताच त्याच चाहतीने झहीरचे त्याच जुन्या शैलीत स्वागत केले. हे पाहून माजी वेगवान गोलंदाज जहीर आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या गालावर लाजाळू हास्य पाहायला मिळाले. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
विशेष म्हणजे झहीर खानचा संघात LSG मार्गदर्शक म्हणून समावेश करण्यात आला आहे. झहीर लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहणार आहे. त्याचबरोबर ऋषभ पंतवर लखनौ संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. पंतला लखनौ फ्रँचायझीने लिलावात 27 कोटी रुपयांना विकत घेतले, त्यामुळे तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Before You Go
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला


















