Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींनी कोणताही निर्णय घेताना राहावं सावध, अन्यथा... वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 17 To 23 March 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 17 To 23 March 2025 : मार्च महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - सिंह राशीच्या लोकांनी प्रेमाच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. हा आठवडा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे जोडीदाराबरोबर प्रामाणिक राहा.
करिअर (Carrer) - या आठवड्यात तुम्ही कामातील वादविवादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तसेच, टीमवर्कमध्ये काम करताना आपल्या अहंकाराला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
आर्थिक स्थिती (Wealth) - या काळात तुमची आर्थिक स्थिती काहीशी खालावलेली दिसेल. त्यामुळे पैसे जपण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्ही नवीन व्यवसायाचा देखील विचार करु शकता.
आरोग्य (Health) - या आठवड्यात तुम्हाला आरोग्याच्या छोट्या-छोट्या कुरघोडी जाणवतील. यासाठी तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. भरपूर पाणी प्या.
कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या आठवड्यात तुम्ही तुमच्या लव्ह लाईफवर लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. लॉग डिस्टन्स रिलेशनशिप तुमच्यासाठी वर्क करणार नाही.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, टीम वर्कमध्ये काम करत असताना तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवून काम करणं गरजेचं आहे. तरच तुमच्या कामावर त्याचा परिणाम दिसून येईल.
आर्थिक स्थिती (Wealth) - तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. जर तुम्हाला नवीन घर किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
आरोग्य (Health) - या काळात तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. यासाठी महिलांनी अंगावर दुखणं न काढता वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

