छातीत दुखू लागल्यानं एआर रहमान रुग्णालयात दाखल; आता मुलानं शेअर केली महत्त्वाची अपडेट, म्हणाला...
AR Rahman Hospitalised: ए. आर. रहमान यांच्यावर योग्य ते औषधोपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

AR Rahman Hospitalised: ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार (Oscar-Winning Composer) आणि गायक ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांची अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. छातीत तीव्र वेदना होत असल्यामुळे त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. अशातच यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ए. आर. रहमान यांच्यावर योग्य ते औषधोपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
58 वर्षीय संगीतकार ए. आर. रहमान यांना आज सकाळी 7.30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. तात्काळ त्यांचा ईसीजी काढण्यात आला. आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल असलेले ए.आर. रहमान सतत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली होते. अखेर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आल्यानंतर चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलनं हेल्थ अॅडव्हायझरी जारी केली आहे. तसेच, रहमान यांच्या प्रकृती अस्वास्थाचं कारण डिहायड्रेशन असल्याचं सांगितलं आहे. आरोग्य तपासणीनंतर ए. आर. रहमान यांना डिस्चार्ज देण्यात आला.
एआर रहमान यांच्या टीमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या रमजानचा महिना सुरू आहे. त्यामुळे रोजा ठेवल्यामुळे त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाला. तसेच, आता ए. आर. रहमान यांच्या मुलानंही त्यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे.
काय म्हणाला एआर रहमान यांचा मुलगा काय म्हणाला?
एआर रहमान यांच्या रुग्णालयात दाखल होण्याच्या विविध कारणांमुळे आणि बातम्यांदरम्यान, रहमान यांचा मुलगा एआर अमीननं त्याच्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. अमीननं लिहिलं आहे की, त्याच्या वडिलांना डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आणि सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे.
एआर रहमानच्या आजारपणाबाबत सायरा रहमान काय म्हणाल्या?
"मी सायरा रहमान बोलतेय. मी एआर रहमान लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करते. मला बातमी मिळाली की, त्यांना छातीत वेदना होत होत्या आणि त्यामुळे त्यांची अँजिओ झाली. देवाच्या कृपेनं, ते आता ठीक आहेत... मी तुम्हाला सर्वांना हे देखील सांगू इच्छिते की, आमचा अधिकृतपणे घटस्फोट झालेला नाही, आम्ही अजूनही पती-पत्नी आहोत... माझ्या आरोग्याच्या कारणास्तव आम्हाला वेगळं व्हावं लागलं. गेल्या दोन वर्षांपासून माझी तब्येत ठीक नव्हती आणि मी त्यांना जास्त ताण देऊ इच्छित नव्हते. कृपया, मी तुम्हाला मीडियाच्या लोकांना विनंती करते की, मला 'पूर्वाश्रमीची पत्नी' म्हणून संबोधू नका. आम्ही वेगळे आहोत एवढीच गोष्ट आहे, पण माझ्या प्रार्थना नेहमीच त्यांच्यासोबत आहेत. मी त्यांच्या (एआर रहमानच्या) कुटुंबालाही सांगू इच्छिते की, त्यांना जास्त स्ट्रेस देऊ नका आणि त्यांची काळजी घ्या.", असं सायरा रहमान म्हणाल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

