विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या (Vitthal Temple Pandharpur) बाहेर लावलेला पंखा (Fan) केवळ मंत्र्यांसाठी आहे का? असा थेट सवाल जळगावच्या महिला भाविकाने मंत्री हसन मुश्रीफांना विचारला.
Vitthal Temple Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या (Vitthal Temple Pandharpur) बाहेर लावलेला पंखा (Fan) केवळ मंत्र्यांसाठी आहे का? असा थेट सवाल जळगावच्या महिला भाविकाने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना केला. जळगाव येथील एका महिला भाविकाची लहानशी मुलगी खेळताना पडल्यानंतर ही महिला आपल्या लहान मुलीला पंख्याखाली घेऊन उभारली होती. यावेळी पोलिसांनी महिलेला मंत्री येत असल्याने बाजूला सरकावले. यावरुन महिलेनं चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय घडलं?
जळगाव येथील एका महिला भाविकाची लहानशी मुलगी खेळताना पडली होती. त्यानंतर महिला आपल्या लहान मुलीला पंख्याखाली घेऊन उभारली होती. यावेळी पोलिसांनी महिलेला मंत्री येत असल्यानं बाजूला सरकावले. याबाबत महिलेने थेट मुश्रीफांना विचारणा केली. बाहेर लावलेला पंखा (Fan) केवळ मंत्र्यांसाठी आहे का? असा सवाल महिलेनं केला. यावर हसन मुश्रीफ यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच संबंधित पोलिसांशी या महिलेला बोलायला सांगितले. मात्र, पोलीस तात्काळ निघून गेल्याचं या महिलेने सांगितले. यामुळं संतप्त भाविकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर हे राज्यासह देशभरातील वारकऱ्यांसाठी मोठं श्रद्धेचं ठिकाण आहे. दररोज या ठिकाणी लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. यावेळी मंदिर परिसरात मोठी गर्दी असते. तसेच सातत्यानं राजकीय, सामाजिक, अर्थ, कला, क्रिडा क्षेत्रातील लोक देखील विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात.
महत्वाच्या बातम्या:
Pandharpur Temple Visit : नवदाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मंदिर समितीचा मोठा निर्णय!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

