Remedy For Honey Bee Sting: मधमाशी चावल्यानंतर लोखंड का लावतात? सूज कमी होते का? जाणून घ्या
Remedy For Honey Bee Sting: एखाद्या व्यक्तीला मधमाशीने दंश केल्याने त्याला सूज आणि तीव्र वेदना झाल्याचं अनेकदा ऐकलं आणि पाहिलं असेल मात्र, असं झाल्यावर अनेकजण त्या जागेवर लोखंड घासतात, पण हे कितपत योग्य आहे?

Remedy For Honey Bee Sting: प्रत्येकाला मधमाशीबद्दल माहिती आहे की, तीच्यामुळे आपल्याला गोड मध मिळतो. मध जितका गोड आणि चविष्ट आहे मिळतो, तितकाच मधमाशीचा दंशही प्राणघातक आहे. मधमाशीचा डंख झाल्यास आपल्याला जखम होते. मधमाशी आपल्या डंखाचा वापर आपल्या पोळ्याचे संरक्षण करण्यासाठी करते. पण जेव्हा एखाद्या माणसाला मधमाशीने दंश केला तर सूज येते आणि तीव्र वेदना होतात. काही वेळा लोकांना काय करावे हे समजत नाही, तेव्हा ते मधमाशीच्या दंशाच्या भागावर लोखंड घासतात आणि आराम मिळतो. त्यामुळे सूजही येत नाही, असे म्हणतात. यामागील सत्य काय आहे ते जाणून घेऊया.
मधमाशी डंख कशी मारते?
मधमाश्यांच्या डंखाबद्दल प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत. त्याचा डंक कसा काढायचा आणि कोणते उपचार करावेत हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. यामुळे संसर्ग कसा होतो आणि दंश झाल्यानंतर बरे वाटायला किती वेळ लागतो? जेव्हा मधमाशी डंख मारते, तेव्हा तिचा डंख तिच्या शरीरापासून वेगळा होतो आणि तुमच्या शरीरात जातो, त्यामुळे वेदना आणि टोचल्यासारखे काहीतरी जाणवते.
मधमाशीचे डंख ही एक साधी जखम आहे, परंतु मधमाशी कोणालाही टार्गेट करू शकते आणि डंख करू शकते. जेव्हा कोणी त्यांच्या जवळ येते किंवा त्यांना त्रास देते किंवा त्यांचे पोळे खराब करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मधमाश्या हल्ला करतात. अनेक वेळा लोकांना मधमाशीच्या डंकाची ऍलर्जी होते, तर कधी कधी त्याचा डंक जीवघेणाही असतो. तुम्हाला तर मधमाशीने डंख मारला असेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि उपचार घ्या. त्याचबरोबर बरेच लोक घरगुती उपचारांद्वारे बरे करण्याचा प्रयत्न करतात.
डंख लागलेल्या जागी लोखंड चोळल्याने आराम मिळतो का?
असे म्हणतात की, मधमाशी चावल्याच्या जागी लोखंड चोळल्याने वेदना आणि सूज होत नाही. हा उपाय काम करतो, मधमाशी चावल्यास त्या भागावर ताबडतोब लोखंड घासावे. यामुळे वेदना आणि सूज दोन्हीपासून आराम मिळतो. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही चावी, कुलूप, लोखंडी चिमटे किंवा इतर कोणत्याही लोखंडाच्या तुकड्याच्या स्वरूपात लोखंड वापरू शकता. ज्या जागी मधमाशीने डंख केला आहे, त्या जागी लगेचच लोखंड लावा.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

