AR Rahman Hospitalised: संगीतकार ए. आर. रहमान अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांकडून उपचार, आता 'त्या' रिपोर्टसची प्रतीक्षा
AR Rahman Hospitalised: म्युझिक कंपोजर ए.आर. रहमान यांना चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

AR Rahman Hospitalised: संगीतकार ए.आर. रहमान यांना चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती अस्वास्थामुळे एआर रहमान यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. अचानक छातीत दुखू लागल्यानं रहमान यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर रहमान यांचे काही रिपोर्ट्स करण्यात आले आहेत.
संगीतकार ए.आर. रहमान यांना प्रकृती अस्वास्थामुळे चेन्नईतील ग्रीम्स रोडवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रसिद्ध आणि ऑस्कर विजेते संगीतकार सध्या प्रसिद्ध अपोलो हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. एआर रहमान सध्या 58 वर्षांचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक छातीत दुखू लागल्यानं एआर रहमान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुप्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच, काही वृत्तवाहिन्यांनी दावा केला आहे की, एआर रहमान यांना दुपारपर्यंत डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. पण, अद्याप त्यांच्या कुटुंबियांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, त्यांच्या प्रकृतीबाबतही अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.
NDTV नं दिलेल्या वृत्तानुसार, गायक एआर रहमान नुकतेच लंडनहून परतले आहेत. अशातच सध्या रमजानचा महिना सुरू असल्यामुळे त्यांचे रोजे सुरू आहेत. त्यामुळेच त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाला. अशा परिस्थितीत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
काही दिवसांपूर्वीच पुर्वाश्रमीच्या पत्नीवर झालेली तातडीची शस्त्रक्रिया
काही दिवसांपूर्वी ए.आर. रहमान यांची पुर्वाश्रमीची पत्नी सायराला प्रकृतीच्या तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. आता ए.आर. रहमान यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ए.आर. रहमान यांनीही त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी आजारी पडल्यानंतर एक निवेदन जारी केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं की, काही दिवसांपूर्वी सायरा रहमान यांना प्रकृतींच्या तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या सभोवतालच्या लोकांच्या काळजी आणि पाठिंब्याची ती मनापासून आदर करते आणि तिच्या अनेक हितचिंतकांना आणि समर्थकांना तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करते.























