चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया पुन्हा एकदा बनली चॅम्पियन, सचिन अन् अंबाती रायडूचा करिश्मा, इंटरनॅशनल मास्टर्स लीग भारताने जिंकली
International masters league 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया पुन्हा एकदा बनली चॅम्पियन, सचिन अन् अंबाती रायडूचा करिश्मा, इंटरनॅशनल मास्टर्स लीग भारताने जिंकली

International masters league 2025 : भारताने आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत international masters league चं विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला आणि ट्रॉफीवर नाव कोरलंय. अंतिम सामन्यात वेस्टइंडिजने प्रथम फलंदाजी करताना 148 धावा केल्या होत्या आणि भारतापुढे 149 धावांचं आव्हान ठेवलं होतं. वेस्टइंडिजच्या या आव्हानाचा भारताने 17 चेंडू शिल्लक ठेऊन सहजरित्या पाठलाग केलाय. भारताच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला तो अंबाती रायडू, त्याने 50 चेंडूत 74 धावांची खेळी केली.
🇮🇳 INDIA MASTERS ARE THE CHAMPIONS OF THE INAUGURAL IMLT20, 2025 🏆
— CricTracker (@Cricketracker) March 16, 2025
They defeated Brian Lara-led West Indies Masters by 8 wickets in the final 💥#IndiaMasters #IMLT20Final #Champions pic.twitter.com/7OQQlWSojh
वेस्ट इंडिजचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर ड्वेन स्मिथने 45 धावांची खेळी केली, परंतु ब्रायन लारा आणि विल्यम्स पर्किन्स 6-6 धावा करून बाद झाले. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर ड्वेन स्मिथने 45 धावा केल्या, परंतु ब्रायन लारा आणि विल्यम्स पर्किन्स प्रत्येकी 6 धावांनी पराभूत झाले. शाहबाज नदीमने अत्यंत घातक गोलंदाजी केली, त्याने 4 षटकात केवळ 12 धावा दिल्या आणि 2 बळीही घेतले. लेंडल सिमन्सने 57 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, परंतु नदीमनंतर विनय कुमारनेही भारतासाठी भेदक मारा केला. कुमारने या सामन्यात 3 बळी घेतले.
वेस्टइंडिजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून अंबाती रायडूने दमदार कामगिरी केली. रायुडूने सचिन तेंडुलकरसोबत 67 धावांची सलामीची भागीदारी केली, सचिन 25 धावा करून बाद झाला. गुरकीरत सिंग मान 14 धावा करून बाद झाला. दुसरीकडे रायडूने भारताचा डाव सावरला, त्याने 50 चेंडूत 74 धावा केल्या. त्याने 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. शेवटच्या षटकांमध्ये स्टुअर्ट बिन्नीने 9 चेंडूत 16 धावांची छोटी खेळी खेळली आणि भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला.
टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून एक आठवडाच झाला असताना आता टीम इंडियाने आणखी एक ट्रॉफी जिंकलीये. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडिया मास्टर्सने आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगचे विजेतेपद पटकावलंय. संपूर्ण स्पर्धेत भारताने 7 सामने खेळले, त्यापैकी फक्त एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
🇮🇳 INDIA MASTERS ARE THE CHAMPIONS OF THE INAUGURAL IMLT20, 2025 🏆
— CricTracker (@Cricketracker) March 16, 2025
They defeated Brian Lara-led West Indies Masters by 8 wickets in the final 💥#IndiaMasters #IMLT20Final #Champions pic.twitter.com/7OQQlWSojh
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

