Nagpur News: गुडीपाडव्याला नरेंद्र मोदी हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार? नागपूरच्या संघस्थानी जाणारे ठरणार पहिले पंतप्रधान
Nagpur News: संघाच्या शतकपूर्ती वर्षातील 30 मार्च गुडीपाडवाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे रेशीमबागच्या स्मृतिमंदिर येथील डॉ हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्याची शक्यता आहे.

Nagpur News: संघाच्या शतकपूर्ती वर्षातील 30 मार्च गुडीपाडवाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे रेशीमबागच्या स्मृतिमंदिर येथील डॉ हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे (Rashtriya Swayamsevak Sangh Headquarters) दर्शन घेण्याची शक्यता आहे. स्मारक समितीच्या वतीने भैय्याजी जोशी पंतप्रधानांचे स्वागत करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान असं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरच्या (Nagpur News) संघस्थानी जाणारे पहिले पंतप्रधान ठरणार असल्याचे ही सांगितलं जातंय.
पुढे आलेल्या माहितीनुसार, 30 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ते नागपूरच्या माधव नेत्रालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करणारा आहे. यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर सरसंघचालक मोहन भागवत असणार आहे. तर या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीला पण भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे आता सऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्याकडून पंतप्रधान मोदींचे आभार
बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय. या बाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'पीएम गतिशक्ती' अंतर्गत 'नेटवर्क प्लॅनिंग गटा'च्या '89व्या' बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला.
32.460 किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाय तसेच बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत यांसारख्या प्रवाश्यांच्या आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांच्या कनेक्टीव्हिटीमध्ये वाढ अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.
हा पायाभूत प्रकल्प 'पीएमजीएस एनएमपी'च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, यामुळे विविध ठिकाणांदरम्यान जोडणी सुधारेल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मुख्यमंत्र्यांनी मानले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























