IPL 2025 : मेगा लिलावात UNSOLD, मग देशांतर्गत क्रिकेटमध्ये उडवून दिली खळबळ! आता पठ्ठ्याने थेट पंतच्या संघात मारली एन्ट्री
इंडियन प्रीमियर लीगचा अठरावा हंगाम आता फक्त एका आठवड्यात सुरू होणार आहे. आरसीबीपासून ते सीएसके आणि दिल्ली-मुंबई इंडियन्सपर्यंत सर्वांनी मेगा लिलावात चांगला संघ तयार केला होता.

IPL 2025 Shardul Thakur : अलिकडेच आयपीएल मेगा लिलावात शार्दुल ठाकूर अनसोल्ड राहिला होता. या अष्टपैलू खेळाडूसाठी कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती, परंतु आता शार्दुल ठाकूरशी संबंधित मोठी माहिती समोर येत आहे. खरंतर, शार्दुल ठाकूर या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचा भाग असू शकतो. लखनऊ सुपर जायंट्सच्या कॅम्पमध्ये शार्दुल ठाकूर सराव करताना दिसला. त्यानंतर शार्दुल ठाकूर लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळेल अशी अटकळ सतत लावली जात आहे. त्याच वेळी, लखनऊ सुपर जायंट्सचे वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि मोहसिन खान यांच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह कायम आहे.
Shardul Thakur was seen training in the LSG camp ahead of IPL 2025. pic.twitter.com/3MugL9FEzw
— Jay Cricket. (@Jay_Cricket12) March 16, 2025
शार्दुल ठाकूर लखनऊ सुपर जायंट्सच्या जर्सीमध्ये सराव करताना दिसला
रविवारी लखनऊ सुपर जायंट्सच्या कॅम्पमध्ये शार्दुल ठाकूर सराव करताना दिसला. यादरम्यान, शार्दुल ठाकूर लखनऊ सुपर जायंट्सच्या जर्सीमध्ये होता. शार्दुल ठाकूरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जरी, आतापर्यंत लखनऊ सुपर जायंट्सने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु असे मानले जाते की, लखनऊ सुपर जायंट्सने शार्दुल ठाकूरला करारबद्ध केले आहे. खरंतर, शार्दुल ठाकूर आयपीएल 2024 च्या हंगामापर्यंत चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता, पण त्यानंतर सीएसकेने त्याला सोडले. आयपीएल मेगा लिलावात कोणत्याही संघाने शार्दुल ठाकूरमध्ये रस दाखवला नाही.
मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये उडवून दिली खळबळ!
आयपीएल मेगा लिलावात अनसोल्ड राहल्यानंतर शार्दुल ठाकूर देशांतर्गत क्रिकेटकडे वळला. शार्दुल ठाकूरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. 2024-25 च्या रणजी ट्रॉफी हंगामात शार्दुल ठाकूर मुंबईचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. शार्दुल ठाकूरने 6 डावात 19 विकेट्स घेतल्या. याशिवाय त्याने फलंदाजीतही आपली ताकद दाखवली. शार्दुल ठाकूरने फलंदाज म्हणून 245 धावा केल्या. या हंगामात, शार्दुल ठाकूर मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर होता.
शार्दुल ठाकूरची आयपीएल कारकीर्द
शार्दुल ठाकूर आतापर्यंत आयपीएलमध्ये 5 संघांचा भाग राहिला आहे. या काळात त्याने 95 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 9.22 च्या इकॉनॉमीने 94 विकेट्स घेतल्या. तसेच, त्याने 307 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या गेल्या हंगामात शार्दुल ठाकूर सीएसके संघाचा भाग होता. त्याला एकूण 9 सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने फक्त 5 विकेट्स घेतल्या आणि तो खूप महागडाही ठरला, ज्यामुळे त्याला यावेळी कोणताही खरेदीदार मिळाला नाही.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

