Nandurbar News: फक्त पायाला टिचकी मारली अन् मृत घोषित केलेलं बाळ जिवंत झालं; नंदुरबारमध्ये थक्क करणारी घटना!
Nandurbar News : नंदुरबार सू्र्यपूरमध्ये एक अनोखा प्रकार घडला आहे. यात मृत घोषित केलेल्या बाळाच्या पायाला टिचकी मारताच तो श्वास घेऊ लागलाय. दरम्यान आता या घटनेची सर्वत्र एकच चर्चा होऊ लागली आहे

Nandurbar News: ज्याच्या आयुष्याची दोरी बळकट त्याला काहीच होऊ शकत नाही. याचाच प्रत्यय देणारी घटना नंदुरबारच्या सू्र्यपूरमध्ये घडली आहे. तेलखेडी येथील महिलेचं दोन महिन्यांचे बाळ उलट्या आणि अतिरडण्याने निपचित पडले होतं. दरम्यान यात बाळाचा मृत्यू झाल्याचं वाटल्यामुळे सर्वांच्याच अश्रूचा बांध फुटला. मात्र एकदा खात्री करून घ्यावी या अनुषंगाने बाळाला जवळच्याच आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. तपासणी दरम्यान डॉक्टरांनी जेव्हा बाळाची तपासणी केली आणि हलकेच पायाला टिचकी मारली तेव्हा मोठं आश्चर्य घडलं. यात चक्क बाळाने मोठा श्वास घेतला आणि बाळ जीवंत असल्याचे समोर आलं. या घटनेमुळे सर्वांच्याच जीवात जीव आला.
धुळ्यातील या घटनेची देशभरात जोरदार चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबारच्या तेलखेडी येथे राहणाऱ्या मिनाबाई सचिन पावरा ही महिला होळीसाठी आपल्या माहेरी सूर्यपूर येथे गेली होती, यावेळी मिनाबाई यांचे दोन महिन्यांचे बाळ उलट्या आणि अति रडण्याने निपचित पडले. शिवाय हे बाळ कुठलीही हालचाल करत नव्हतं. त्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे साऱ्यांना वाटलं आणि कुटुंबातील साऱ्यांचा अश्रूचा बांध फुटला, एकच रडारड सुरू झाली. मात्र परिवारातील नातेवाईकांनी डॉक्टर गणेश तडवी यांना बोलावलं आणि एकदा खातरजमा करून घेतली. मात्र यावेळी जे घडलं ते पाहून साऱ्यांना धक्काच बसला. डॉक्टर तडवी यांनी आपला अनुभव वापरत तपासणी सुरू केली आणि मुलाच्या पायाला टिचकी मारली. यात बाळाने चक्क श्वास घेत हालचाल करायला सुरुवात केली. त्यामुळे परिवारासाठी डॉक्टर हे केवळ डॉक्टर नव्हे तर देवदूत बनले आहे. अशातच या घटनेची आता केवळ जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
श्वानाचा 2 वर्षीय चिमुकलीवर हल्ला
यवतमाळच्या आर्णी शहरातील हाफिज बेगनगर येथे एका 2 वर्षीय चिमुकलीवर रस्त्याने जाणाऱ्या श्वानाने हल्ला केलाय. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झालीय. सकीना मोहसीन शेख (वय वर्ष 2) असे हल्यात जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. चिमुकली ही घरासमोर खेळत असताना घरा समोरून जाणाऱ्या श्वानाने अचानकपणे या चिमुकलीवर हल्ला चढविला. हल्ला एवढा भयंकर होता की चिमुकलीची आई त्या श्वानाला मारत होती, त्याला पकडून ओढत होती, तरी तो चिमुकलीला सोडायला तयार नव्हता. तिला तात्काळ उपचारा करिता रुग्णालयात हलविण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
