एक्स्प्लोर

PM किसान योजनेसंदर्भात महत्वाची बातमी! 15 एप्रिलपासून सुरु होणार नवीन मोहिम, कृषीमंत्र्यांनी दिली लोकसभेत माहिती

देशातील शेतकऱ्यांना (Farmers)  आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवण्यात येते. या योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana :  केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). देशातील शेतकऱ्यांना (Farmers)  आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवण्यात येते. या योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जे शेतकरी या योजनेशी अद्याप जोडले गेले नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. 

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपयांचा वार्षिक लाभ मिळतो. मात्र, जे शेतकरी या योजनेशी काही कारणामुळं जोडले गेले नाहीत, त्या शेतकऱ्यांना देखील योजनेशी जोडण्याची संधी मिळणार असल्याचे चौहान म्हणाले. पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेशी जोडण्यासाठी सरकारकडून मोहीम राबवली जात आहे. यामध्ये तीन मोहिमा राबवण्यात आल्या असून चौथी मोहीम 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राज्य सरकारांना या योजनेंतर्गत पात्र असलेल्या अशा शेतकऱ्यांची ओळख करुन देण्यासाठी सरकारला मदत करण्यास सांगितले. अशा शेतकऱ्यांना मागील थकबाकीची रक्कमही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोबाईल ॲप आणि पीएम किसान पोर्टलही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. 

शेतकऱ्यांनी हे काम पूर्ण करावं

अनेक शेतकरी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणीकृत आहेत, परंतु तरीही लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात पोहोचत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. जसे की ई-केवायसी झाली नाही, लाभार्थी शेतकऱ्याच्या जमिनीची पडताळणी झालेली नाही किंवा अर्ज करताना शेतकऱ्याने काही चूक केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांना योजनेच्या लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात वेळेवर पोहोचण्यासाठी सर्व आवश्यकता पूर्ण करण्यास सांगितले आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता शेतकरी 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत किती रुपये मिळाले, आकडेवारी आली समोर!

महत्त्वाच्या बातम्या

Elephant Maya Airlifted To Vantara : केरळमधील 18 महिन्यांची 'माया' एयरलिफ्टने वनतारात दाखल, गंभीर आजाराने त्रस्त हत्तीच्या पिल्लावर उपचार सुरू
केरळमधील 18 महिन्यांची 'माया' एयरलिफ्टने वनतारात दाखल, गंभीर आजाराने त्रस्त हत्तीच्या पिल्लावर उपचार सुरू
मोठी बातमी! कर्मभूमी एक्सप्रेसला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धावपळ, बचावकार्य सुरु, नेमकी घटना घडली कशी? 
मोठी बातमी! कर्मभूमी एक्सप्रेसला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धावपळ, बचावकार्य सुरु, नेमकी घटना घडली कशी? 
CBSE Board Exam 2027 : 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून रंगणार परीक्षांचा संग्राम, पाहा संपूर्ण वेळापत्रक
10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून रंगणार परीक्षांचा संग्राम, पाहा संपूर्ण वेळापत्रक
साखरेचा दर 31 वरुन 42 रुपये करा, ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनची सरकारकडे मोठी मागणी, साखर पुन्हा महागणार का?  
साखरेचा दर 31 वरुन 42 रुपये करा, ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनची सरकारकडे मोठी मागणी, साखर पुन्हा महागणार का?  

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Embed widget