मोठी बातमी : शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाला गोळ्या झाडून संपवलं
Eknath Shinde Shiv Sena : शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाला गोळ्या झाडून संपवलं

Eknath Shinde Shiv Sena : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील मोगा क्षेत्राचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांना गोळ्या घालून संपवण्यात आलंय. त्यामुळे पंजाबमधील शिवसेनेत खळबळ उडाली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दु:ख व्यक्त केलं असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, शिंदेंच्या नेत्याची हत्या करण्यात आल्यानंतर पंजाबमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
पंजाब राज्य के मोगा क्षेत्र में शिवसेना के हमारे जिलाध्यक्ष मंगतराम मंगा जी की गोली मारकर की गई नृशंस हत्या बेहद दुखदाई है.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 16, 2025
पंजाब में खालिस्तानी विचारधारा वाले लोगों द्वारा की गई एक शिवसैनिक की खुलेआम हत्या वहां आप सरकार की जर्जर हो चुकी कानून व्यवस्था को उजागर करती है. पंजाब…
शिवसैनिकाची हत्या झाल्यानंतर एकनाथ शिंदे आक्रमक
दरम्यान, शिवसैनिकाची हत्या झाल्याचे समजल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, आमचे शिवसेना जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा जी यांची पंजाब राज्यातील मोगा भागात गोळ्या झाडून झालेली निर्घृण हत्या अत्यंत दुःखद आहे. पंजाबमध्ये खलिस्तानी विचारसरणीच्या लोकांनी शिवसैनिकाची खुलेआम केलेली हत्या केलीये. पंजाबमधील आप सरकार कायदा व सुव्यवस्था ठेवण्यात अपयशी ठरलंय. पंजाबमधील आप सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो. हत्येतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी देखील एकनाथ शिंदेंनी केलीये.
एकनाथ शिंदेंकडून मंगतराम यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना दिवंगत मंगतराम यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभी आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने मी स्वर्गीय मंगतराम जी यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षाचे कष्टाळू जिल्हाध्यक्ष आणि हिंदुत्वाला समर्पित देशभक्त स्व.मंगतराम जी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली..!
पंजाब राज्य के मोगा क्षेत्र में शिवसेना के हमारे जिलाध्यक्ष मंगतराम मंगा जी की गोली मारकर की गई नृशंस हत्या बेहद दुखदाई है.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 16, 2025
पंजाब में खालिस्तानी विचारधारा वाले लोगों द्वारा की गई एक शिवसैनिक की खुलेआम हत्या वहां आप सरकार की जर्जर हो चुकी कानून व्यवस्था को उजागर करती है. पंजाब…
इतर महत्त्वाच्या बातम्या
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

