एक्स्प्लोर

दररोज 7 जणांचा मृत्यू, मुंबई उपनगरीय रेल्वेतील मृत्यूदर जगात सर्वाधिक असणं लज्जास्पद, हायकोर्टाची गंभीर दखल

Mumbai Local : मुंबईच्या तिन्ही रेल्वेमार्गांवर दररोज सरासरी 7 लोकांचा मृत्यू होत असून लोकलनं प्रवास करणं म्हणजे युद्धावर जाण्यासारखं असल्याचं पालघरमधील प्रवाशाच्या याचिकेत म्हटलं आहे. 

Mumbai Local Death Rate : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान लोकलमधील गर्दीमुळे वाढत्या मृत्यूंची हायकोर्टानं बुधवारी गंभीर दखल घेतली. मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणारे मृत्यूदर हे 38.08 टक्के इतकं असून हा जगातील सर्वाधिक मोठा असल्यानं ती एक लज्जास्पद बाब असल्याचे ताशेरे हायकोर्टानं ओढलेत. यावर दोन्ही रेल्वे प्रशासनाच्या महाव्यवस्थापकांना सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश जारी करत सॉलिसिटर जनरल यांना पुढील सुनावणीत कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिलेत.

मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या मृत्यूसंदर्भात पालघरस्थित यतीन जाधव यांच्या हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली असून त्यावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेमुळे होणारा मृत्यूदर हा 38.08 टक्के असून हाच मृत्यूदर न्यूयॉर्कमध्ये 9.08 टक्के, फ्रान्समध्ये 1.45 टक्के आणि लंडनमध्ये 1.43 टक्के इतका असल्याचं या याचिकेत म्हटलंय.

टोकियोनंतर जागतिक स्तरावर दुसरी सर्वात व्यस्त रेल्वे यंत्रणा म्हणून मुंबई उपनगरीय रेल्वेची ओळख आहे. मोठ्या संख्येनं प्रवासी असल्याची सबब पुढे करून रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. ज्या पद्धतीनं मुंबईकर प्रवास करतात ते लज्जास्पद असल्याची टिका करत हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला खडे बोल सुनावले. न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन केल्याचं सांगता तर मृत्यूचं प्रमाण का कमी झालेलं नाही? अशी अशी विचारणा हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाकडे केली. निदान आता तरी मानसिकता बदलत पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून नवीन तंत्रज्ञान वापरून मृत्यू रोखण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा विचार करण्याची सूचना हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला केली आहे.

आकडेवारी काय सांगते?

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेतून साल 2023 मध्ये 2 हजार 590 प्रवाशांनी आपला जीव गमावला असून सरासरी दररोज सात जणांचा मृत्यू झाला आहे. यात मध्य रेल्वेवरील अपघातांमध्ये 1 हजार 650 जणांचा तर पश्चिम रेल्वेवर 940 जणांचा मृत्यू झालाय. तर एकूण 2 हजार 441 जण जखमी झाल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्यावतीनं वकील रोहित शहा यांनी हायकोर्टाला दिली. यात रेल्वे रुळ ओलांडताना, रेल्वेतून पडून अथवा रेल्वेच्या खाबांना आदळून झालेल्या घटनांची नोंद आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेतून प्रवाशांच्या संख्येत गेल्या काही वर्षात 85 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, रेल्वेकडून पायाभूत सोयीसुविधा आजही तेवढ्याच आहेत. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करणं म्हणजे एखाद्या युद्धावर जाण्यासारखं असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केला.

दुसरीकडे, रेल्वे नियमावलीनुसार, रेल्वे रुळ ओलांडताना आणि रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळत नाही. निव्वळ रेल्वे अपघात किंवा रेल्वेमध्ये आग लागलेल्यांनाच नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. परदेशातील रेल्वे प्रमाणे काचेचे दरवाजे, योग्य ठिकाणी रेल्वेचे पादचारी पूल असणं इत्यादी गोष्टींकडे लक्ष दिल्यास मृत्यूदर कमी होऊ शकतो, असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Vidhan Sabha Election Exit Poll : केजरीवालांच्या आपची पुन्हा सत्तेत येण्याची संधी हुकण्याची शक्यताCity 60 News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : 05 Feb 2025 : ABP MajhaDelhi Vidhan Sabha Election Exit Poll : बहुतांशी एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता येण्याचा अंदाजSuresh Dhas : संतोष देशमुख हत्येचा तपास आणि  गृहमंत्र्यांचं सहकार्य; सुरेश धस नेमकं काय म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
Raigad : रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
Embed widget