42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे हद्दीत प्रवाशांच्या खिशातील मोबाईल लंपास करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आलीय.

ठाणे : रेल्वे स्थानक तसेच बस स्थानक परिसरात असलेल्या गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे महागडे मोबाईल लंपास करणाऱ्या पर राज्यातील दुकलीला कल्याण (Kalyan) रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकानं कल्याण रेल्वे यार्ड ते कल्याण स्थानकात येणाऱ्या मार्गावर सापळा रचून अटक केली आहे. या दोघांकडून आतापर्यत 23 गुन्हे उघडकीस आणून 42 महागडे मोबाईल (Mobile) हस्तगत केल्याची माहिती कल्याण रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय खेडकर यांनी दिली. चिन्ना व्यंकटेश पुसला, (वय ३२ मुळगांव, हुबळी, जि धारवाड, राज्य कर्नाटक) अशोक हणमंता आवुला (वय २५) व राह. मुळगांव ता. एल. बी.नगर, जि. रंगारेडडी, राज्य-तेलंगणा ) असे अटक सराईत चोरट्याची नावे असून दोघेही सद्या कल्याण -शीळ मार्गावरील दहिसर मोरी गावात भाड्याच्या खोलीत राहत होते
रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे हद्दीत प्रवाशांच्या खिशातील मोबाईल लंपास करणारी टोळी सक्रिय झाली असून या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे पोलीस आयुक्त, रविंद्र शिसवे यांच्या आदेशाने तपास सुरू असतानाच कल्याण गुन्हे शाखेच्या पथकातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय खेडकर पोलीस निरीक्षक रोहित सांवत यांच्या पथकाला खबर मिळाली होती. त्यानुसार, परराज्यातील दोघे चोरटे कल्याण पूर्वेतील रेल्वे यार्ड मार्गे 30 जानेवारी रोजी येत असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे रेल्वे गुन्हे पथकाने कल्याण रेल्वे यार्ड ते कल्याण स्थानकात येणाऱ्या मार्गावर सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने अधिक चौकशी केली असता, दोन्ही पर राज्यातील चोरटयांकडून आतापर्यत 23 गुन्हे उघडकीस आणले असून 24 मोबाईल हस्तगत केलं आहेत. गुन्ह्यातील मोबाईल फोनसह एकूण ६,७९,0३७ रुपयांचे मोबाईल फोन हस्तगत केले. त्यातील, 23 मोबाईल फोन कल्याण, डोंबिवली व ठाणे रेल्वे पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 3(5) प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय खेडकर यांनी दिली आहे. या दोन्ही चोरट्याकडून आणखीही मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येणार आल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं























