Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील

Antilia Bungalow electricity bill : जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असलेले मुकेश अंबानी सातत्याने उद्योग विश्वासह जगभरात चर्चेत असतात. मुकेश अंबांनींच्या अँटेलिया या बंगल्याचीही चर्चा देखील सातत्याने सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. कारण अँटेलिया हा बंगला फक्त पाहाण्यासाठीच सुंदर नाही, तर या बंगल्यातील सुविधाही वाखाण्याजोग्या आहेत. मात्र, मुकेश अंबानींच्या सव्वा एकरात पसलेल्या अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बिल किती येतं? एका महिन्यात अंबानी किती वीज वापरतात? याबाबत जाणून घेऊयात...
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानींची ओळख
रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 96.6 अरब डॉलर एवढी आहे. मुकेश अंबानी देशातील 18 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
मुंकेश अंबानींचा अँटेलिया बंगल्याची सोशल मीडियावर चर्चा
मुंकेश अंबानींच्या अँटेलिया या बंगल्यापासून त्यांच्या लाईफस्टाईलची सोशल मीडियावर चर्चा असते. मुकेश अंबानींचं अँटेलिया हे घर जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. मात्र, तुम्हाला त्याच्या घरात कोणत्या सुविधा आहेत माहिती आहेत का? 27 मजली असलेल्या अँटेलियामध्ये जीम, स्पा, सिनेमागृह, टेरेस गार्डनर, स्विमिंग पूर, मंदिर आणि आरोग्य विभागापर्यंत सर्वकाही आहे. याशिवाय अँटेलियामध्ये 150 पेक्षा जास्त गाड्यांसाठी पार्किंची सुविधा आहे. याशिवाय टेरेस गार्डन आणि तीन हेलिपॅड देखील आहेत. दरम्यान, बंगल्याच्या सहाव्या मजल्यावर अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब राहतं.
अंबानी कुटुंबाने 2006 मध्ये 1.120 एकर जमिनीवर अँटेलिया या आपल्या बंगल्याचे काम सुरू केले होते आणि ते 2010 मध्ये पूर्ण झाले होते. त्याच्या बांधकामासाठी सुमारे 6000 कोटी रुपये खर्च झाले. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ही जमीन मुकेश अंबानींच्या अँटिलिया कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने 2002 मध्ये 2.5 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केली होती.
अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं वीज बिल किती?
एवढ्या महागड्या आणि सुसज्ज इमारतीत विजेचा प्रचंड वापर होत असावा, हे आता तुमच्या मनात येत; असेल. होय, या इमारतीत दर महिन्याला भरपूर वीज वापरली जाते. डीएनए वेब टीमच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानींच्या घरात दर महिन्याला सुमारे 6,37,240 युनिट वीज वापरली जाते. त्यामुळे त्यांचे सरासरी वीज बिल सुमारे 70 लाख रुपये आहे. तथापि, हा आकडा सतत कधी वाढत असतो तर कधी कमी झालेलाही पाहायला मिळालेला आहे. एवढ्या पैशात सामान्य माणून ग्रामीण भागात त्याचा चांगला बंगला देखील बांधू शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली























