PM Modi takes holy dip at Triveni Sangam : त्रिवेणी संगमावर पंतप्रधानमोदींचं अमृतस्नान दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पण, या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज येथे महाकुंभात जाणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी पवित्र त्रिवेणी संगमान स्नान करतील आणि गंगा मातेची पूजा करतील.प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ 2025 सुरू झाला आहे. हा जगातील सर्वात मोठा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मानला जातो. जगभरातील भाविक यात सहभागी होत आहेत. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभ सुरू राहणार आहे. पीएम मोदींपूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी महाकुंभला भेट दिली आहे.