एक्स्प्लोर
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
जालना जिल्यातील ब्रम्हपुरी गावातून मुलाचं अपहरण करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात. चिमुकल्या मुलाचं अपहरण करणाऱ्यांना उचलण्यात पोलिसांनी यश आलंय.
Kidnap boy meet mother in sambhajinagar
1/7

जालना जिल्यातील ब्रम्हपुरी गावातून मुलाचं अपहरण करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात. चिमुकल्या मुलाचं अपहरण करणाऱ्यांना उचलण्यात पोलिसांनी यश आलंय.
2/7

विशेष म्हणजे चिमुकला मुलगा अपहरण करण्यात आलेल्या कारचा अपघात झाल्यामुळे सापडला. संभाजीनगर शहरातून ज्या गाडीतून मुलाचं अपहरण करण्यात आले होते, त्या गाडीचा जालना जिल्ह्यातील भोकरदन जवळ अपघात झाला. त्यामुळे अपहरण प्रकरणातील आरोपी सापडले आहेत.
3/7

अपघात झाल्यामुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. दरम्यान, चार आरोपींना घेऊन पोलीस संभाजीनगरला पोहोचले आहेत. तर, अपह्रत मुलगाही सुखरुप घरी पोहोचला आहे.
4/7

गेल्या 24 तासांपासून आपल्या मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या चिमुकल्याची आई दारातच त्याच्या स्वागताला उभी होती. तर, या आईला धीर देण्यासाठी मित्र, नातेवाईकही सोबत होते.
5/7

पोलिसांनी मुलाला पालकांच्या स्वाधीन केल्यानंतर घरी येताच चिमुकल्याचे औक्षण करण्यात आले, त्यावेळी घर परिवार, मित्र व नातेवाईक मोठ्या संख्येने उभे होते.
6/7

मुलाचे घरात आगमन होताच समोर उभ्या असलेल्या आईला मुलागा बिलगला. त्यावेळी, आई व मुलाच्या डोळ्यात पाणी आले होते. आपल्या आईला पाहून मुलगा ढसाढसा रडला.
7/7

आई आणि मुलाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते, तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून घरी उपस्थितांचेही डोळे पाणावले.
Published at : 05 Feb 2025 08:16 PM (IST)
आणखी पाहा























