Hasan Mushrif on Wife: सायराssss, पत्नीचं नाव घेतलं, मुश्रीफांच्या हस्ते व्हॉईस फाऊंटनचं उद्घाटनकोल्हापूर - पत्नी सायराच्या नावाचा उल्लेख करत मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं व्हॉईस फाऊंटनचं उद्घाटन.... कोल्हापुरातील कागल मधल्या पाझर तलावामध्ये व्हॉईस फाउंटन बसवण्यात आला आहे... हा देशातील पहिला व्हॉईस फाउंटन असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे... या व्हॉइस फाउंटनचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं... या फाउंटन उद्घाटना वेळी हसन मुश्रीफ यांनी आपल्या पत्नीचं सायरा हे नाव मोठ्याने घेतलं... मुश्रीफ यांनी जाहीरपणे पहिल्यांदाच इतक्या मोठ्याने पत्नीचे नाव घेतल्यान कार्यकर्त्यांनी देखील त्यांना दाद दिली..