Pune Crime News: बाथरूममध्ये व्हिडिओ काढताना सापडलेल्या कामगारांकडून 'चोप'; पोलिसांनी फोन चेक केल्यानंतर दिसलं वेगळंच चित्र, महिलांचे नव्हे तर...
Pune Crime News: पुण्यातील एका कार्यक्रमात एक जण बाथरूममध्ये व्हिडिओ घेताना आढळून आल्याने कामगारांनी पकडून त्याला चोप दिला.

पुणे: पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये किळसवाणा प्रकार काल (शनिवारी) घडला आहे. स्वच्छतागृहात लघुशंका करणाऱ्याचा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. पुण्यातील अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 48 वर्षीय व्यक्तीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मंगेश जवाहिरे (35) याच्यावर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल (शनिवारी) संध्याकाळी 7 वाजता घडली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातील असलेल्या एका लॉन्समध्ये एक नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात होतं. यावेळी एक जण स्वच्छतागृहात व्हिडिओ काढत असल्याचे समजल्यानंतर एकच गोंधळ उडाला. यावेळी पळून जात असलेल्या आरोपीला तेथील कामगारांनी पकडले आणि चोप दिला. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल तपासला असता तर त्याने महिलांचा नव्हे तर पुरुषांच्या स्वच्छतागृहात लघुशंका करणाऱ्याचा व्हिडिओ काढला असल्याचे दिसून आले आहे. याबाबत लॉन्समधील एका कामगाराने पोलिसात फिर्याद दिली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, डीपी रोडवरील एका लॉन्सच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात लघुशंका करणार्यांचा व्हिडिओ काढणार्याला तेथील कामगारांनी बेदम मारहाण करून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महिलांचे स्वच्छतागृहातील व्हिडिओ त्याने काढल्याचा समज सुरुवातीला झाला होता. मात्र त्याचा फोन तपासल्यानंतर त्याने पुरुषांच्या स्वच्छतागृहात लघुशंका करणाऱ्याचा व्हिडिओ काढला असल्याचे दिसून आले आहे. मंगेश नंदकुमार जवाहिरे (वय 35, रा. अजिंक्य हाईटस, कात्रजगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत लॉन्समधील एका कामगाराने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना डी पी रोडवरील एका लॉन्स मध्ये रविवारी सायंकाळी 7 वाजता घडली आहे.
लॉन्समध्ये एका कार्यक्रमासाठी शेकडो लोक एकत्र आले होते. त्यावेळी एक जण स्वच्छतागृहात व्हिडिओ चित्रिकरण करत असल्याचे काही जणांनी सांगितल्याने एकच गोंधळ उडाला. सुरुवातीला त्याने महिलांचे व्हिडिओ काढल्याचा लोकांचा समज झाला होता. गोंधळ झाल्यावर तो पळून जाऊ लागला. तेव्हा तेथील कामगारांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला चांगला चोप दिला आणि पोलिसांना बोलावून त्यांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईलची तपासणी केली. तेव्हा त्यात महिलांचे नाही तर पुरुष लघुशंका करतानाचा व्हिडिओ आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी लॉन्सच्या कामगाराची फिर्याद घेऊन रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

