एक्स्प्लोर

जीएसटी भवनच्या आगीचे मनपात पडसाद, पायाभूत सुविधा कमी पडत असल्याची प्रशासनाची कबुली

मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 20 ते 22 गाड्या घटनास्थळी जाऊन ही आग आटोक्यात आणली. या आगीच अनेक महत्वाच्या फाईल्स जळल्या असल्याची शक्यता आहे.

मुंबई : भायखळा येथे जीएसटी भवनला आग लागून महत्वाच्या फायली जळाल्या असल्याचा संशय आहे. या आगीचे पडसाद स्थायी समितीतही उमटले. नगरसेवकांनी मुंबईत अशा आगी लागत आहेत आणि अग्निशमन दल केवळ विकासकांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात गुंतले असल्याचा आरोप करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. परंतु अग्निशमन दल चांगले काम करत असले तरी पायाभूत सुविधांचा अभाव असल्याची कबुली पालिका अतिरिक्त आयुकत पी.वेलारासु यांनी दिली. परंतु त्यांच्या या कबुलीने सर्वच नगरसेवक संतप्त झाले आणि त्यांनी प्रशासनाचा हा निष्क्रियपणा आहे.तो असाच सुरू राहिला तर मुंबईकरांच्या जीवितांचे रक्षण कोण करणार? असा सवाल केला. मुंबईत गेल्या 8 दिवसांत 10 ठिकाणी आगी लागल्या. भायखळा येथील जीएसटी भवनला लागलेली आग मोठी होती. अशा आगी लागत राहिल्यातर मुंबई सुरक्षित राहिल का? असा सवाल पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आणि याला अग्निशमन दलाचे अधिकारी आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला. जीएसटी भवनच्या नवव्या आणि दहाव्या मजल्यावर आग लागली तिथे महत्वाची कागदपत्रे होती. तर, 10 वा मजला अतिरिक्त बांधकाम केला होता याचा प्रथम प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
तर जीएसटी भवनने अग्नी सुरक्षेचे नियम पाळले होते का?आणि ही आग कशी लागली याचा अहवाल स्थायी समिती पुढे आला पाहिजे अशी मागणी केली. नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी 364 अहवाल काय म्हणतो? याचे वाचनच करून दाखविले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आगीचे कारण आयुक्तांना सांगणे बंधनकारक असते. पण तसे काही घडलेच नाही.
जीएसटी भवनच्या आगीचे मनपात पडसाद, पायाभूत सुविधा कमी पडत असल्याची प्रशासनाची कबुली
नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी देखील अशा आगीच्या घटना आपण रोखू शकत नसू तर आपण करदात्या मुंबईकरांचे रक्षण कसे करणार असा प्रश्न उपस्थित केला. नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी आगीच्या घटनेबदल नाराजी व्यक्त केली. आपण कोट्यवधी रूपयांची सामुग्री खरीदी करतो आणि त्यानंतरही आगीच्या घटना घडत असतील तर त्याला जबाबदार कोण? असे ते म्हणाले. सपाचे गटनेते आणि आमदार रईस शेख यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी केवळ विकासकांना एनओसी देतात असा आरोप केला.
जीएसटी भवनच्या आगीचे मनपात पडसाद, पायाभूत सुविधा कमी पडत असल्याची प्रशासनाची कबुली
अग्निशमन दलाचे काम चांगले: अतिरिक्त आयुक्त अग्निशमन दलाचे कार्य चांगले आहे. मात्र मुंबईतील साडेचार लाख प्रॉपर्टीजपर्यंत प्रॅक्टिकली ते पोहोचू शकत नाहीत. कारण त्यांना पायाभूत सुविधा कमी पडत असल्याचा खुलासा अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासु यांनी केला. अग्निशमन दल बिल्डरांना एनओसी देते असा आरोप होता. तो खोडताना त्यांनी आपण नियमांच्या अधिन राहूनच ते काम करत असतो असे ते म्हणाले. मुंबईला 70 अग्निशमन केंद्राची गरज: प्रभात रहांगदळे मुंबईत आता 34 अग्निशमन केंद्रे आहेत. शहरात 60 ते 70 अग्निशमन दल केंद्राची आवश्यकता असून मिनीफायर स्टेशन वाढविल्यास आगी रोखण्यात दलाला यश येईल, असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी स्थायी समितीत सांगितले. अग्निशमन दलाकडे 700 मनुष्यबळ आहे. आणखी मनुष्य बळाची गरज असून स्वयंसेवकांनी मदत करून आगी संदर्भात मदत केल्यास आगीचे प्रमाण रोखण्यात पालिकेला यश येईल असे ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget