Shani Gochar 2025 : अवघ्या 10 दिवसांत दोन वेळा बदलणार शनीची चाल, 5 राशींचं आयुष्य 360 डिग्री बदलणार; करिअरला लागणार यूटर्न
Shani Gochar 2025 : 10 दिवसाच्या आत शनीच्या स्थितीत दोन वेळा बदल हा 5 राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी (Shani Dev) 29 मार्च 2025 रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 6 एप्रिल 2025 रोजी मीन राशीत उदित होणार आहे. सध्या शनीचा (Lord Shani) कुंभ राशीत अस्त होणार आहे. त्यानंतर लगेचच मीन राशीत शनीचा उदय होणार आहे. त्यामुळे 10 दिवसाच्या आत शनीच्या स्थितीत दोन वेळा बदल हा 5 राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
ज्योतिष शास्त्रानुसार, शनीच्या स्थितीत होणारा बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या अनेक समस्या दूर होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे चांगले संबंध निर्माण होतील. तसेच, नात्यात मजबूती येईल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, पैशांची तुम्हाला कमतरता भासणार नाही.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. तसेच, भविष्यात तुम्ही केलेल्या मेहनतीचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या काळात मात्र विनाकारण पैसे खर्च करु नका. तुमच्या आयुष्यात आनंद राहील.
तूळ रास (Libra Horoscope)
या काळात तुम्हाला खूप चांगला लाभ मिळेल. तुमचं आरोग्य चांगलं राहील. या काळात तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघेल. तसेच, समाजातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. करिअरची नवी उंची गाठाल. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमची महत्त्वाची कामे लवकर पूर्ण होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीची ढैय्या समाप्त होणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तसेच, जर तुम्ही नोकरी बदलीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे. तसेच, कुटुंबियांबरोबर तुम्ही दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी शनीचं संक्रमण आणि शनीचं उदय होणं फार लाभदायक ठरणार आहे. शनीची साडेसाती संपल्याने प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. तसेच, या काळात तुम्ही छोट्या-मोठ्या यात्रेचा लाभ घेऊ शकता. जे लोक अविवाहित आहेत त्यांचा लवकर विवाह होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















