एक्स्प्लोर
5 रुपयांचा शेअर 290 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना दिला 6000 टक्के परतावा, डीमार्टच्या दमानींकडे 43 लाख शेअर
Stock Market Update : भारतीय शेअर बाजारात सध्या घसरण सुरु असलं तरी गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

शेअर मार्केट अपडेट
1/6

भगीराधा केमिकल्स अँड इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. कीटकनाशके अन् कृषीविषयक रसायनांच्या निर्मिती उद्योगातील या कंपनीचे शेअर लिस्ट झाल्यापासून 6000 टक्क्यांनी वाढले आहेत.
2/6

डीमार्टचे मालक राधाकिशन दमानी यांच्याकडे या कंपनीचे तब्बल 43 लाख शेअर आहेत. हा शेअर लिस्ट झाल्यापासून गेल्या 10 वर्षात 5 रुपयांवरुन 290 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
3/6

भगिराधा केमिकल्स अँड इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गेल्या 10 वर्षात 6093 टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीचा शेअर 13 मार्च 2015 ला 4.82 रुपयांवर होता. कंपनीचे शेअर सध्या 298.50 रुपयांच्या दरम्यान आहेत. कंपनीच्या शेअरचा उच्चांक 448 रुपये तर निचांकी पातळी 152.50 रुपये आहे.
4/6

भगिगराधा केमिकल्स अँड इंडस्ट्रीजचा शेअर गेल्या पाच वर्षात 1059 ट्क्यांनी वाढला आहे. 13 मार्च 2020 ला कंपनीची शेअर 25.75 रुपयांवर होता. तो आता 298.50 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या चार वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 703 टक्के तेजी पाहायला मिळाली. गेल्या तीन वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 243 टक्क्यांची वाढ झाली.
5/6

अवेन्यू सुपरमार्टसचे मालक राधाकिशन दमानी यांच्याकडे भगिराधा केमिकल्स अँड इटस्ट्रीज चे 43,06,487 शेअर आहेत. कंपनीत दमानी यांच्याकडे 3.32 टक्के भागिदारी आहे.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 14 Mar 2025 02:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
